Gold Rate : सोन्याच्या किमती आणखी वाढणार? इस्राईल- इराण युद्धाचा भारताला फटका बसण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात (Gold Rate) सातत्याने वाढ होताना दिसत आहे. जागतिक स्तरापासून ते भारतीयपर्यंत सोन्याचे दर वाढलेले दिसत आहेत. याशिवाय चांदीच्या दरातही आता विक्रमी वाढ झालेली आहे. इराण आणि इज्राइलमध्ये जे युद्ध होत आहे. त्या युद्धामुळे सध्या सोन्याच्या किमती वाढलेल्या आहेत. सोने आणि चांदीचे दर आणखी वाढू शकतात. असे देखील तज्ञांनी मत व्यक्त केले आहे.

मार्चमध्ये दहा टक्के वाढल्यानंतर एप्रिलमध्ये सोन्याच्या (Gold Rate) या दरामध्ये खूप वाढ झालेली आहे. सोन्याची किंमत वाढण्यामागचे कारण म्हणजे फेड रिझर्वने जाहीर केलेल्या महागाईच्या आकडेवारीनंतर सोन्याच्या दरात वाढ होण्यास आणखी चालना मिळालेली आहे. आता इज्राइल आणि इराकमध्ये जे वाद चालू आहेत. तो वाढल्यामुळे सोनाच्या किमती देखील पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

12 एप्रिल रोजी सोन्याचा भाव हा 73 हजार 958 रुपये प्रति दहा ग्राम एवढा होता. त्याचप्रमाणे चांदीची किंमत ही 86 हजार 126 रुपये प्रति एक किलो एवढी होती. फेब्रुवारीमध्ये चांदीच्या दरात दहा टक्क्याने तर एप्रिलमध्ये पाच टक्क्यांनी वाढ झालेली आहे.

सोन्याबद्दल बोलायचं झाले, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव सध्या 74 हजार रुपये आहे. एप्रिलमध्ये 9 दिवसातच सोन्याचा भाव हा 74 हजारवर पोहोचला आहे. म्हणजेच प्रतिक्रम सोन्याचा भाव तीन हजार 70605 रुपयांनी वाढवून तो आता 74370 रुपये एवढा झालेला आहे. चांदीच्या किंमती तरी झपाट्याने वाढ झालेली आहे. चांदीचा सराफाला 78 हजार रुपये प्रतिक्रिया एवढा भाव होता. परंतु तो आता 85500 रुपये किलोवर गेलेला आहे.

आपण नेहमी चांदी आणि सोन्यामध्ये गुंतवणूक केलेली सुरक्षित मानतो. परंतु सध्या युद्ध आणि वाढत्या महागाईच्या काळात सोने खरेदी करणे लोकांना परवडत नाही. इराण आणि इस्राईलमध्ये युद्ध चालू आहे. त्या युद्धामुळे सोन्याची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच सोन्याचे दर देखील वाढत आहे.

भारतामध्ये दागिन्यांना सध्या मोठी मागणी आहे. कारण सध्या भारतात लग्नाचा सिझन चालू आहे. त्यामुळे या काळात बरेच लोक सोने आणि चांदी खरेदी करतात. या सगळ्याच्या परिणामामुळे एप्रिल महिन्यात सोने आणि चांदीच्या किमती वाढलेल्या आहेत.