हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Gold Rate Today। भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे भर हिवाळ्यात सोने खरेदीदार ग्राहकांना घाम फुटला आहे. आज १२ डिसेंबर २०२५ रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव 133643 रुपयावर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीत 0.89% म्हणजेच तब्बल 1174 रुपयांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदी मात्र 6342 रुपयांनी घसरल्याने सर्वसामान्य ग्राहकांना थोडाफार का होईना पण दिलासा मिळाला आहे.
भारतातील सोन्याच्या किमतींवर (Gold Rate Today ) आंतरराष्ट्रीय स्पॉट सोन्याचे दर, अमेरिकन डॉलरमधील चढ-उतार आणि सोन्यावरील आयात शुल्क यांसारख्या घटकांचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडतो. तसेच राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती दररोज बदलतात. मागील ५ वर्षात सोन्याच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. खास करून कोरोना काळानंतर सोने गगनाला भिडले. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना सोने खरेदी करणे जवळपास अशक्य गोष्ट झाली आहे. काहीजण आजकाल सोन्याकडे गुंतवणुकीच्या दृष्टीने सुद्धा पाहतात.
गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Rate Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-
पुणे- 122750 रुपये
मुंबई – 122750 रुपये
नागपूर – 122750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 131910 रूपये
मुंबई – 131910 रूपये
नागपूर – 131910 रूपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दर्जाशी कधीही तडजोड करू नका. हॉलमार्क असलेले दागिनेच खरेदी करा, कारण हॉलमार्क हीच सोन्याची सरकारी खात्री आहे. भारतात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हे हॉलमार्क प्रमाणपत्र देते. प्रत्येक कॅरेटचे वेगळे हॉलमार्क चिन्ह असते, ते तपासूनच खरेदी करावी. जर तुम्ही हॉलमार्कची खात्री न करता सोने खरेदी केले, तर त्यात भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी दागिने खरेदी करताना योग्य तपासणी करा आणि दर्जेदार सोनेच निवडा.




