हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Gold Rate Today। जून महिन्यातील बाजाराच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या किमतींनी नवं शिखर गाठलं आहे. भारतीय सराफा बाजारात २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव 96102 रुपयांवर पोचला असून यामध्ये तब्बल 1458 रुपयांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीनेही नवा उच्चांक गाठला आहे. १ किलो चांदीचा दर 97650 रुपयांवर गेला असून या किमती 635 रुपयांनी महाग झाल्यात. सोने- चांदीच्या किमतीत दररोज बदल पाहायला मिळतात. आता सोन्याचांदीच्या किमती वाढल्याने खरेदीदार ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज MCX वर आज २ जून २०२५ रोजी २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा व्यापार 95227 रुपयांवर उघडला. आधीच्या बाजारात हाच दर 94644 रुपये होता. आज मार्केट सुरु होताच सोन्याचा भाव (Gold Rate Today) सुरुवातीपासून वर वर जाताना दिसला. ११ वाजून २४ मिनिटांनी सोने ९५६७५ रुपयांवर व्यवहार करत होते. त्यानंतर १२ वाजून २ मिनिटांनी हाच दर ९६०२७ च्या उच्चांकी पातळीवर गेला. सध्या १२ वाजून २९ मिनिटांनी २४ कॅरेट १० ग्राम सोन्याची किंमत ९६१११ रुपये आहे.
गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Rate Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-
पुणे- 89500 रुपये
मुंबई – 89500 रुपये
नागपूर – 89500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 97640 रूपये
मुंबई – 97640 रूपये
नागपूर – 97640 रूपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दर्जाशी कधीही तडजोड करू नका. हॉलमार्क असलेले दागिनेच खरेदी करा, कारण हॉलमार्क हीच सोन्याची सरकारी खात्री आहे. भारतात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हे हॉलमार्क प्रमाणपत्र देते. प्रत्येक कॅरेटचे वेगळे हॉलमार्क चिन्ह असते, ते तपासूनच खरेदी करावी. जर तुम्ही हॉलमार्कची खात्री न करता सोने खरेदी केले, तर त्यात भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी दागिने खरेदी करताना योग्य तपासणी करा आणि दर्जेदार सोनेच निवडा.