Gold Rate Today । उद्या गुढीपाडवा.. हिंदूंचा पवित्र सण.. गुढीपाडव्यापासूनच मराठी नववर्ष सुरु होतं. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडवा हा अतिशय शुभ मानला जातो…. मात्र गुढीपाडव्यापूर्वी सोन्याचे भाव वाढल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे. खरं तर गेल्या काही काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसतेय. शनिवारी 29 मार्च 2025 रोजी पुन्हा एकदा सोनं महागलं आहे.. सोन्याच्या नव्या किमती काय आहेत? ते आज आपण सविस्तर पाहुयात….
मल्टी कमोडिटी एक्सचेंज नुसार, २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव 88850 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीत ०. ०५ टक्के म्हणजेच ४४ रुपयांची वाढ झाली आहे. तर MCX वर १ किलो चांदी 100480 रुप्यानावर व्यवहार करत आहे… चांदीच्या किमतीत सुद्धा २२ रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे.. ऐन गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येलाच सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांना काहीसा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळतेय. सोनं हा सुरक्षित गुंतवणुकीचा योग्य पर्याय असल्याने सोन्याची मागणी वाढत आहे आणि त्याचा परिणाम सोन्याच्या दरांवर (Gold Rate Today) होताना दिसत आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांत मौल्यवान धातुच्या किंमती एक लाखांपर्यंत जाणार का, असा सवालही उपस्थित होताना दिसतोय.
गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-
पुणे- 83400 रुपये
मुंबई – 83400 रुपये
नागपूर – 83400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 91200 रूपये
मुंबई – 91200 रूपये
नागपूर – 91200 रूपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.