हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Gold Rate Today । सोने खरेदीदार ग्राहकांसाठी आनंदाची गोष्ट आहे. २ दिवसांच्या दरवाढी नंतर आज सोन्याच्या किमतीं स्वस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्राम सोने 94597 रुपयांवर व्यवहार करत आहेत. कालच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत तब्बल 681 रुपयांची घसरण झाली आहे. जागतिक बाजारातही सोन्याच्या किमती कमी झाल्या आहेत. अमेरिकेच्या एका फेडरल कोर्टाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या “लिबरेशन डे” टॅरिफला स्थगिती दिल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती स्वस्त झाल्याचं बोललं जातंय. त्याचा परिणाम भारतीय मार्केट मध्येही पडला असून भारतातही सोन्याचे भाव आज उतरले आहेत.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज MCX वर आज २९ मे २०२५ रोजी २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा व्यापार 94900 रुपयांवर उघडला जो मागील बाजारात 95278 रुपयांवर बंद झाला होता. सुरुवातीपासूनच सोन्याच्या किमती खाली खाली जाताना दिसल्या. ११ वाजून २० मिनीटांनी सोन्याच्या भावाने ९४५४० रुपयांची नीचांकी पातळी गाठली. त्यानंतर यामध्ये थोडीफार वाढ होऊन सोन्याचा भाव ९४६९३ वर पोचला, मात्र पुन्हा सोन्याच्या किमती घसरत गेल्या. आत्ता सध्या १२ वाजून १५ मिनिटांनी २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव ९४५३२ रुपयांवर व्यवहार करत आहे. (Gold Rate Today)
गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Rate Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-
पुणे- 88950 रुपये
मुंबई – 88950 रुपये
नागपूर – 88950 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 97040 रूपये
मुंबई – 97040 रूपये
नागपूर – 97040 रूपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दर्जाशी कधीही तडजोड करू नका. हॉलमार्क असलेले दागिनेच खरेदी करा, कारण हॉलमार्क हीच सोन्याची सरकारी खात्री आहे. भारतात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हे हॉलमार्क प्रमाणपत्र देते. प्रत्येक कॅरेटचे वेगळे हॉलमार्क चिन्ह असते, ते तपासूनच खरेदी करावी. जर तुम्ही हॉलमार्कची खात्री न करता सोने खरेदी केले, तर त्यात भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी दागिने खरेदी करताना योग्य तपासणी करा आणि दर्जेदार सोनेच निवडा.




