हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Gold Rate Today । ८ डिसेंबर २०२५ रोजी भारतीय सराफा बाजारात सोन्याची किमतीत वाढ झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर सोन्याचा भाव १,३०,४९४ वर उघडला. काल सोन्याचा व्यवहार १,३०,४६२ रुपयांवर बंद झाला होता. आज बाजाराच्या सुरुवातीला सोन्याच्या किमतीत किरकोळ वाढ बघायला मिळाली. तर दुसरीकडे चांदी मात्र ४५३ रुपयांनी स्वस्त झाली आहे. आज एक किलो चांदीचा भाव सध्या 182950 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती दररोज बदलतात.
अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा वाढल्यामुळे आज सोन्याचे दर (Gold Rate Today) वाढताना दिसत आहेत. अमेरिकेतील अलीकडील आर्थिक आकडेवारीवरून देशातील कामगार बाजारपेठेत मंदी दिसून येते, ज्यामुळे आर्थिक सुलभतेची आशा आणखी बळावते. याव्यतिरिक्त, फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदासाठी आघाडीचे दावेदार जेरोम पॉवेल हे अधिक कठोर धोरण स्वीकारतील अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे सोन्याच्या किमतींमध्ये वाढ होईल असं बोललं जातंय. आज सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी सोन्याने १३०७६१ रुपयांचा उच्चांक गाठला. त्यानंतर सोन्याच्या किमती वर खाली जाऊ लागल्या. सध्या १२ वाजून ४० मिनिटांनी २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव १३०७२८ रुपये इतका आहे.
गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Rate Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-
पुणे- 1195500 रुपये
मुंबई – 119100 रुपये
नागपूर – 1195500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 130420 रूपये
मुंबई – 130420 रूपये
नागपूर – 130420 रूपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दर्जाशी कधीही तडजोड करू नका. हॉलमार्क असलेले दागिनेच खरेदी करा, कारण हॉलमार्क हीच सोन्याची सरकारी खात्री आहे. भारतात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हे हॉलमार्क प्रमाणपत्र देते. प्रत्येक कॅरेटचे वेगळे हॉलमार्क चिन्ह असते, ते तपासूनच खरेदी करावी. जर तुम्ही हॉलमार्कची खात्री न करता सोने खरेदी केले, तर त्यात भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी दागिने खरेदी करताना योग्य तपासणी करा आणि दर्जेदार सोनेच निवडा.




