हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Gold Rate। सोने हा भारतीयांचा आवडता दागिना.. कोणत्याही शुभकार्यात किंवा सणासुदीला अनेक भारतीय मोठ्या उत्साहाने सोन्याची खरेदी करतात. परंतु मागच्या काही वर्षात सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य ग्राहक चिंतेत आहे. सद्यस्थितीत सोन्याचा भाव १ लाख रुपयांच्या पार गेला आहे. अशावेळी सोने खरेदी करावं का? कि किमती कमी झाल्यानंतर सोन्याची खरेदी करावी याबाबत ग्राहकांच्या मनात गोंधळाचे वातावरण आहे. आता सोन्याच्या किमतीबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. भविष्यातही सोन्याचा दर असाच कायम वाढत राहील… येत्या काळात सोन्याच्या किमती २२९ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असून ग्राहकांना एक तोळा सोन्याच्या खरेदीसाठी तब्बल 3.61 लाख रुपये मोजावे लागू शकतात. स्विस आशियाने हा अंदाज वर्तवला आहे.
स्विस आशियाने सोन्याच्या किमतींबाबत (Gold Rate) सर्वात मोठा दावा केला आहे. सोन्याची सध्याची किंमत प्रति १० ग्रॅम १.१० लाख रुपयांपर्यंत आहे. २०३२ पर्यंत सोन्याची किंमत ११९% वरून २२९% पर्यंत वाढू शकते. जर सोन्यात ११९% वाढ झाली तर नवीन किंमत प्रति १० ग्रॅम सुमारे २,४०,९०० रुपये असेल. जर २२९% वाढ झाली तर ती प्रति १० ग्रॅम ३,६१,९०० रुपयांपर्यंत पोहोचू शकते. म्हणजेच, पुढील ७ वर्षांत सोने प्रति १० ग्रॅम २.४० लाख रुपयांवरून ३.६१ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. सोन्याच्या किमतींबाबतचा हा अन्दाज खरा ठरला तर एक तोळा सोने खरेदी करणंही सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर जाईल .
सध्या सोने प्रति औंस $३,६५० वर आहे. कॅपिटल लीगचे राजुल कोठारी म्हणतात की, नजीकच्या भविष्यात सोने $३,७००-$३,८०० पर्यंत जाऊ शकते. परंतु , अल्पावधीत २-५% ची घसरण देखील होऊ शकते.
का वाढत आहेत सोन्याच्या किमती? Gold Rate
जागतिक अनिश्चितता आणि भारतीयांची पारंपारिक खरेदी यामुळेच सोन्याच्या किमतीचा आलेख हा वर वरच जात आहे. स्पेक्ट बुलियन अँड रिफायनरीचे सीईओ दर्शन देसाई यांच्या मते भविष्यात सोन्याच्या किमतीत काही चढउतार होतील, परंतु सुरक्षित गुंतवणुकीची मागणी आणि जागतिक आर्थिक परिस्थिती या दोन्ही कारणांनी सोन्याच्या किमती या वाढतच राहतील. दुसरीकडे, आयबीजेएचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांनीही दर्शन देसाई यांच्या सुरात सूर मिसळत म्हंटल कि, जरी बाजार काही काळ स्थिर राहिला तरी, उत्सवाची मागणी आणि सुरक्षित गुंतवणुकीचा प्रवाह सोन्याच्या किमती कमी होऊ देणार नाही.




