Gold RateToday : आपण जाणतोच आहोत की मागील वर्षांपासून सोन्याचा दार दररोज नवीन रेकॉर्डस सेट करीत आहे. 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. त्या दिवशी सोन्याच्या दराने जबरदस्त उचांक गाठला आणि सोने थेट 84 हजार 490 रुपये प्रति 10 ग्राम वर जाऊन पोहचले. आता आजचा सोन्याचा दर पहिला तर सोन्याच्या दरात (Gold RateToday) काहीशी घसरण झाली असून आज २४ कॅरेट सोन्याचा दर 84,050 रुपये झाला आहे. आज 440 रुपयांची घसरण सोन्याच्या दरात झालेली पाहायला मिळत आहे. चला पाहुयात 22 आणि 24 कॅरेटचे दर सविस्तर …
24 कॅरेट (Gold RateToday)
आज 24 कॅरेट एक ग्राम सोन्याचा दर आठ हजार चारशे पाच रुपये इतका आहे. हाच दर काल 8449 रुपये इतका होता. म्हणजेच आज एक ग्राम 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 44 रुपयांची घसरण झाली आहे. तर दहा ग्राम 24 कॅरेट सोन्याचा दर 84 हजार 50 रुपये इतका आहे. हाच दरकाल 84,490 इतका होता म्हणजेच आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 440 रुपयांची घसरण झाली आहे.
22 कॅरेट (Gold RateToday)
तर 22 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल सांगायचा झाल्यास आज एक ग्राम 22 कॅरेट सोन्याचा दर 7,705 रुपये इतका आहे. हाच जर का 7,745 रुपये इतका होता. म्हणजेच आज एक ग्राम 22 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 40 रुपयांची घसरण झाली आहे. तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 77 हजार 50 रुपये इतका आहे हाच दरकाल 77,450 रुपये इतका होता. म्हणजेच आज 22 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याच्या दरामध्ये 400 रुपयांची घसरण झालेली पाहायला मिळत आहे
सोन्याच्या दरामध्ये घसरण
वित्तमंत्री निर्मला सीतारामण यांनी एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. सरकारने सोन्याच्या वर इम्पोर्ट ड्युटी वाढवली नाही. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. आणि त्यानंतर आज सोन्याच्या दरामध्ये घसरण (Gold RateToday) झालेली पाहायला मिळत आहे.
चांदीचे दर (Gold RateToday)
दुसरीकडे चांदीच्या दराबद्दल सांगायचं झाल्यास 3 फेब्रुवारीला चांदीच्या दरात घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर चांदीचा भाव दोनशे रुपयांनी कमी होऊन 99400 प्रति किलोग्राम इतका झाला आहे. यापूर्वी चांदीचा भाव 99 हजार 600 रुपये इतका होता. त्यामुळे चांदीच्या खरेदीदारांना आणि व्यापाऱ्यांना सुद्धा दिलासा मिळत आहे.




