नवी दिल्ली । भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात साप्ताहिक घसरण झाली आहे. या ट्रेडिंग आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव 397 रुपयांनी घसरला आहे. त्याचबरोबर चांदीचा भाव 409 रुपयांनी घसरला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, या व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला (14 ते 17 मार्च) 24-कॅरेट सोन्याचा दर 51,961 होता, जो गुरुवारपर्यंत 51,564 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. त्याच वेळी, 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 68,414 रुपयांवरून 68,005 रुपये प्रति किलोवर आली आहे.
IBGA ने जारी केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या स्टँडर्ड किमतीची माहिती देतात. या सर्व किमती टॅक्स आणि मेकिंग चार्ज पूर्वीच्या आहेत. IBGA ने जारी केलेले दर देशभरात सार्वत्रिक आहेत मात्र किमतींमध्ये GST चा समावेश नाही.
गेल्या एका आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले ?
18 मार्च 2022 – बाजार सुट्टी
17 मार्च 2022- रुपये 51,564 प्रति 10 ग्रॅम
16 मार्च 2022- रुपये 51,345 प्रति 10 ग्रॅम
15 मार्च 2022- रुपये 67,200 प्रति 10 ग्रॅम
14 मार्च 2022- रुपये 51,961 प्रति 10 ग्रॅम
गेल्या एका आठवड्यात चांदीचा दर किती बदलला ?
18 मार्च 2022 – बाजार सुट्टी
17 मार्च 2022- रुपये 68,005 प्रति किलो
16 मार्च 2022- रुपये 67,182 प्रति किलो
15 मार्च 2022- रुपये 67,200 प्रति किलो
14 मार्च 2022- रुपये 68,414 प्रति किलो
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांत सोन्याची आयात $45 अब्ज झाली आहे
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांत (एप्रिल-फेब्रुवारी) देशाची सोन्याची आयात 73 टक्क्यांनी वाढून $45.1 अब्ज झाली आहे. मागणी जास्त असल्याने सोन्याची आयात वाढली आहे. यासह, मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत सोन्याची आयात $26.11 अब्ज होती.