Gold-Silver Price: आज चांदी झाली स्वस्त, सोन्याची काय स्थिती आहे जाणून घ्या

Gold Price
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोने आणि चांदी तेजीसह ट्रेड करत आहेत. MCX वर, फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याच्या किंमतीत 0.20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे, चांदी 0.41 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे. या वाढीसह सोन्याने 48 हजार रुपयांचा टप्पा पार केला.

सोन्याचा भाव 50,000 च्या पुढे जाऊ शकतो
लग्नाच्या मोसमात सोन्याच्या मागणीत आताच वाढ होत असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हा सण आणि लग्नसराईचा मोसम पुन्हा चमकत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सोन्याचे भाव पुन्हा 50 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या घरात पाहायला मिळतात.

सोन्याची किंमत जाणून घ्या
फेब्रुवारीच्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.20 टक्क्यांच्या वाढीसह 48,293 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​ट्रेड करत आहे.

चांदीची किंमत
आज सराफा बाजारात चांदीचा भाव वाढत आहे. आज चांदीचा भाव 0.41 टक्क्यांनी वाढून 62,440 रुपये किलो झाला आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,540 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,070 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,300 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,300 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,290 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,290 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,300 रुपये
पुणे – 46,540 रुपये
नागपूर – 47,290 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई -48,300 रुपये
पुणे – 49,070 रुपये
नागपूर -48,290 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4655.00 Rs 4628.00 -0.583 %⌄
8 GRAM Rs 37240 Rs 37024 -0.583 %⌄
10 GRAM Rs 46550 Rs 46280 -0.583 %⌄
100 GRAM Rs 465500 Rs 462800 -0.583 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4908.00 Rs 4881.00 -0.553 %⌄
8 GRAM Rs 39264 Rs 39048 -0.553 %⌄
10 GRAM Rs 49080 Rs 48810 -0.553 %⌄
100 GRAM Rs 490800 Rs 488100 -0.553 %⌄