हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PNB : स्वस्तात घर किंवा जमीन खरेदी करायची असेल तर यासाठी पंजाब नॅशनल बँकेकडून एक चांगली संधी मिळत आहे. पंजाब नॅशनल बँकेकडून ई-लिलावाद्वारे हाउसिंग, रेसिडेन्शिअल आणि कॉमर्शियल प्रॉपर्टीचा लिलाव केला जाईल. या लिलावात कोणालाही सहभागी होता येईल. 25 ऑगस्ट रोजी हा लिलाव केला जाणार आहे.
हे लक्षात घ्या कि, पंजाब नॅशनल बँकेकडून त्या संपत्तीचा लिलाव केला जातो ज्या गहाण ठेवून कर्ज घेतलेली लोकं बँकेला पैसे परत करत नाहीत. अशा मालमत्ता ताब्यात घेऊन बँकेकडून लिलावाद्वारे त्यांचे पैसे वसूल केले जातात. तसेच बँकेकडे अशा मालमत्तेची मालकी असल्याने बँकेकडे तिच्या लिलावाचा अधिकार राखून ठेवला जातो. PNB
Your search for affordable residential and commercial properties will come to an end here!
Log on to e-Bikray portal https://t.co/N1l10rJGGS for bidding.#Auction #bidding #AzadiKaAmritMahotsav #AmritMahotsav @AmritMahotsav pic.twitter.com/0SQWa33DdQ
— Punjab National Bank (@pnbindia) August 22, 2022
यामध्ये भाग कसा घ्यावा ???
या ई-लिलावामध्ये भाग घेण्यास इच्छुक असलेल्यांना http://ibapi.in या ई-सेल्स पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यासाठी आपल्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडीद्वारे ई-लिलाव प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन करावे लागेल. तसेच “Pay Pre-Bid EMD” या लिंकवर क्लिक करून NEFT पर्याय वापरून चलन तयार करावे लागेल. यानंतर, त्याला NEFT पेमेंट करण्यासाठी बँकेत जावे लागेल.
कोणत्या कॅटेगिरीमध्ये बोली लावता येईल ???
संभाव्य खरेदीदाराला कोणत्याही कॅटेगिरी अंतर्गत ऑनलाइन रजिस्ट्रेशन करता येईल. या कॅटेगिरीमध्ये व्यक्ती, व्यक्तींचा समूह, फर्म, कंपनी, सहकारी संस्था/ट्रस्ट, सरकारी विभाग किंवा PSU यांचा समावेश होतो. सरफेसी कायद्यांतर्गत जप्त केलेल्या निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांचा लिलावात समावेश करण्यात आला आहे. PNB
‘या’ कागदपत्रांची गरज भासेल
या लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तीला त्याचे केवायसी देखील करावे लागेल. केवायसीसाठी, पॅन कार्ड किंवा फॉर्म 16 आणि मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स यासारखे कोणतेही व्हॅलिड पत्त्याचे पुरावे अपलोड करावे लागतील. याशिवाय मनरेगा जॉब कार्डही वापरता येईल. PNB
हे पण वाचा :
दरमहा 12,388 रुपयांची पेन्शन मिळवण्यासाठी LIC च्या ‘या’ योजनेमध्ये करा गुंतवणूक !!!
LIC Housing Finance चे होम लोन महागले, व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ !!!
Rakesh Jhunjhunwala यांच्या ट्रस्टची कमान राधाकिशन दमानी हाती !!!
Multibagger Stock : गेल्या 23 वर्षांत ‘या’ शेअर्सने दिले 30,000 टक्के रिटर्न !!!
Sovereign Gold Bond द्वारे आजपासून स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी !!!