नवी दिल्ली । जर तुम्ही स्वस्तात घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बँक ऑफ बडोदा तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्वस्तात घर (Residential Property) खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. BOB या प्रॉपर्टीजचा लिलाव करणार आहे. 8 डिसेंबरपासून हा लिलाव सुरू होत आहे. या अशा प्रॉपर्टीज आहेत ज्या डिफॉल्टच्या लिस्टमध्ये आल्या आहेत. याबाबतची माहिती IBAPI (Indian Banks Auctions Morgaged Properties Information) ने दिली आहे.
बँक ऑफ बडोदा ज्या प्रॉपर्टीजचा लिलाव करणार आहे त्यामध्ये रेसिडेंशियल, कॉमर्शियल, इंडस्ट्रियल, एग्रीकल्चर प्रॉपर्टीजचा समावेश आहे.
लिलाव कधी होणार?
बँक ऑफ बडोदा (BOB) ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. बँकेने ट्विटमध्ये लिहिले की,”मेगा ई ऑक्शन 8 डिसेंबर 2021 रोजी केला जाईल. यामध्ये रेसिडेंशियल आणि इंडस्ट्रियल प्रॉपर्टीजचा ई ऑक्शन केला जाणार आहे. तुम्ही येथे वाजवी किमतीत प्रॉपर्टीज खरेदी करू शकाल.”
From office spaces to apartments, everything in one place at one time! #BankofBaroda presents Mega e-Auction on 8th December 2021. Your dream space is now just one click away. Know more https://t.co/ejge3HE0ms#AzadiKaAmritMahotsav #AmritMahotsav pic.twitter.com/1CXkkWMMbc
— Bank of Baroda (@bankofbaroda) December 2, 2021
रजिस्ट्रेशन कुठे करायचे ?
इच्छुक बोलीदारांना बँक ऑफ बडोदा मेगा ई ऑक्शनसाठी e Bkray पोर्टल https://ibapi.in/ वर रजिस्ट्रेशन करावे लागेल. या पोर्टलवर ‘बिडर्स रजिस्ट्रेशन’ वर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीद्वारे रजिस्ट्रेशन करावे लागेल.
KYC डॉक्युमेंट्स आवश्यक असेल
बोलीदाराला आवश्यक KYC डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील. KYC डॉक्युमेंट्स ई ऑक्शन सर्व्हिस प्रोव्हायडरद्वारे व्हेरिफाय केले जाईल. यास 2 कार्य दिवस लागू शकतात.
अधिक माहितीसाठी ‘या’ लिंकवर क्लिक करा
प्रॉपर्टीजच्या लिलावाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, तुम्ही https://ibapi.in/https://www.bankofbaroda.in/e auction.htm?utm_source=SM&utm_medium=Post&utm_campaign=MegaAuction_km या लिंकला भेट देऊ शकता.
बँका वेळोवेळी लिलाव करतात
ज्या प्रॉपर्टीजच्या मालकांनी त्यांच्या कर्जाची परतफेड केलेली नाही अथवा काही कारणासत्व ते देऊ शकलेले नाही. त्या सर्व लोकांच्या जमिनी बँकांकडून ताब्यात घेतल्या जातात. अशा प्रॉपर्टीजचा बँकांकडून वेळोवेळी लिलाव केला जातो. अशा लिप्रॉपर्टीज विकून बँक आपली थकबाकी वसूल करते.