हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. दोन महिन्यांच्या सततच्या घसरणीनंतर AICPI Indexने मोठी उसळी घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मार्च 2022 साठी निर्देशांकाच्या संख्येत 1 अंकाची वाढ झाली आहे. यासह, पुढील महागाई भत्ता (Next DA Hike) 3% ने वाढण्याची शक्यता आहे. मात्र, एप्रिल-मे आणि जूनचे आकडे येणे बाकी आहे. त्यात आणखी वाढ होत राहिल्यास DA मध्ये ४% वाढ होण्याची शक्यता आहे.
मार्चमध्ये AICPI संख्यांमध्ये मोठी उसळी
7व्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोनवेळा महागाई भत्ता दिला जातो. पहिला जानेवारी आणि दुसरा जुलै मध्ये. जानेवारी 2022 साठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3% DA वाढीची भेट मिळाली आहे. आता पुढील महागाई भत्ता जुलैमध्ये दिला जाईल. या दरम्यान, अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकामध्ये महागाईचे आकडे अपडेट केले जातील. आता कामगार मंत्रालयाचे ३ महिन्यांचे आकडे आले आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये थोडीशी घसरण झाली. जानेवारीमध्ये तो 125.1 पर्यंत कमी झाला. त्याच वेळी, फेब्रुवारीमध्ये तो 125 अंकांवर पोहोचला होता. परंतु, मार्चमध्ये मोठी झेप घेतली असून निर्देशांक 1 अंकाने वाढून 126 वर पोहोचला आहे. डिसेंबर 2021 मध्ये, AICPI चा आकडा 125.4 होता.
कामगार मंत्रालयाने आकडेवारी जाहीर केली
सध्या आलेले आकडे पाहिल्यास पुढील महागाई भत्त्यात ३% पर्यंत वाढ होऊ शकते. त्याच वेळी, जर निर्देशांकाने पुढील तीन महिन्यांत उसळी घेतली तर DA वाढ देखील 4% होऊ शकते. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) चा डेटा श्रम आणि रोजगार मंत्रालयाने देशातील 88 औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या केंद्रांमधील 317 बाजारांमधून गोळा केलेल्या किरकोळ किमतींच्या आधारे घेतला आहे. हा निर्देशांक 88 केंद्रांसाठी आणि संपूर्ण देशासाठी तयार करण्यात आला आहे. AICPI दर महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी रिलीज होतो.
केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या राहणीमानाचा खर्च सुधारण्यासाठी महागाई भत्ता दिला जातो. महागाई वाढल्यानंतरही कर्मचाऱ्यांच्या राहणीमानात कोणताही फरक पडू नये यासाठी हा भत्ता वेतन रचनेचा एक भाग आहे, सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांना महागाई सवलत दिली जाते.