जनधन खातेधारकांसाठी खुशखबर !! 2.30 लाखांपर्यंत मोफत सुविधा; कसे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या पंतप्रधान जन धन योजनेला 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. या योजनेंतर्गत उघडलेल्या खात्यांची संख्या काही वर्षांत तिप्पट झाली आहे. मार्च 2015 मध्ये खात्यांची संख्या 14.72 कोटींवरून 43 कोटींवर गेली आहे. मोदी सरकारची ही योजना सर्वसामान्य लोकांसाठी वरदान ठरली आहे. आज आपण या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सुविधा जाणून घेऊयात.

प्रधानमंत्री जनधन योजनेमुळे गरीब लोकांसाठी बँकांचे दरवाजे उघडले गेले आहेत आणि त्यांना जन धन खाते पासबुक आणि रुपे कार्डची नवीन सुविधा दिली आहे. या योजनेअंतर्गत, खाते उघडल्यानंतर, प्रत्येकाला स्वस्त विमा, पेन्शन आणि इतर आर्थिक उत्पादनांची सुविधा देखील दिली जाते.

2.30 लाखांचा लाभ मिळेल

जन धन खातेधारकांना 2.30 लाख रुपयांचा लाभ दिला जातो. जन धन खातेधारकांना कोणत्याही बँकेत खाते उघडल्यावर अपघाती विमा संरक्षण दिले जाते. खातेदारांना 1,00,000 रुपयांचा अपघाती विमा आणि 30,000 रुपयांचा सामान्य विमा दिला जातो. खातेदाराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याला 2 लाख रुपये दिले जातात. अशा प्रकारे जन धन खातेधारक 2.30 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळवू शकतात.

खाते कसे उघडायचे ?

प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जास्त खाते उघडले जाते. मात्र, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमचे जन धन खाते खाजगी बँकेत देखील उघडू शकता. तुमचे दुसरे सेविंग खाते असल्यास तुम्ही ते जन धन खात्यातही वळवू शकता. भारतात राहणारा कोणताही नागरिक, ज्याचे वय 10 वर्षे किंवा त्याहून जास्त आहे, तो जन धन खाते उघडू शकतो.

कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल ?

जन धन खाते उघडण्यासाठी KYC अंतर्गत कागदपत्रांची पडताळणी केली जाते. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, मनरेगा जॉब कार्ड या कागदपत्रांचा वापर करून जन धन खाते उघडता येते.

‘या’ बँकांमध्ये उघडता येतात खाती

प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) अंतर्गत, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जास्त खाती उघडली जातात. तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत जन धन खाते उघडू शकता. मात्र, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमचे जन धन खाते खाजगी बँकेत देखील उघडू शकता.

कोणत्या खाजगी बँकांमध्ये जन धन खाते उघडू शकता

धनलक्ष्मी बँक, येस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक, फेडरल बँक, आयएनजी वैश्य, कोटक महिंद्रा, कर्नाटक बँक, इंडसइंड बँक हे देखील जन धन खाते उघडण्याची सुविधा देतात.

Leave a Comment