नवी दिल्ली । लॉकडाऊनमध्येही EMI भरणा-या ग्राहकांसाठी गुड न्यूज आहे. कर्ज स्थगित (मोरेटोरियम) कालावधीत बँकांनी कर्जदारांच्या खात्यात व्याजावरील व्याज आकारले होते, आत ती रक्कम परत करण्यास बँकांनी सुरुवात केली आहे. या योजनेनंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून ग्राहकांच्या खात्यात कोविड-19 मदत अनुदान रक्कम 3 नोव्हेंबरला जमा करण्यात आल्याचा संदेश पाठविला जात आहे. (Loan Takers Moratorium Interest Rate)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गेल्या आठवड्यात बँका, नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांसह सर्व कर्ज देणा-या संस्थांना 6 महिन्यांच्या मुदतीच्या कालावधीत 2 कोटी रुपयांपर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजावरचे व्याज परत करण्यास सांगितले आहे. रिझर्व्ह बँक ऑफि इंडिया (RBI) ने सर्व सहकारी आणि खासगी बँकांना आणि नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांना (NBFCs) 5 नोव्हेंबरपासून व्याजावर व्याज माफी योजना लागू करण्याचा आदेश दिला आहे. खरंतर लॉकडाऊनच्या काळात ज्यांनी मोरेटोरियम सुविधेचा लाभ घेतलेला नाही, त्यांच्याकडून EMIवर घेतलेलं व्याजावरचं व्याज कॅशबॅकच्या स्वरुपात परत देणार असल्याचं केंद्रानं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे.
सर्वोच्च न्यायालयानंही ही सुविधा तात्काळ लागू करण्याच्या सल्ला दिला आहे. त्यानंतर आता RBI नेदेखील या निर्णयाला हिरवा कंदील दाखवत 5 नोव्हेंबरपासून नियम लागू करण्याचा आदेश दिला होता. सरकारने 5 नोव्हेंबरच्या आधी प्रत्येकाला दिवाळी भेट देण्याची घोषणा केली होती. कोरोना संकटामध्ये नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी रिझर्व्ह बँकेने यंदा 1 मार्च ते 31 ऑगस्ट या कालावधीत कर्जाचा हप्त्याला स्थगिती देण्याचा बँकांना सल्ला दिला होता. त्यानुसार काही बँकांनी सहा महिने हप्ते भरण्याला स्थगिती दिली होती. परंतु नंतर भरलेल्या EMIवर चक्रवाढ व्याजानं पैसे वसूल केले होते.
केंद्रीय अर्थ मंत्रालयानं 23 ऑक्टोबरला या संदर्भात सविस्तर माहिती दिली होती. अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने सांगितले होतं की, केंद्र सरकारच्या या योजनेचा फायदा सर्व कर्जदारांना होणार आहे, त्यांनी सहा महिन्यांच्या हप्ते भरपाईतील सूट मिळवून घेतली असेल की नसेल त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
तसेच 29 फेब्रुवारीपर्यंत आकारलेल्या व्याजदरानुसार ही गणना केली जाणार आहे. सरकार हे पैसे एकरकमी देणार आहे. केंद्र सरकारकडून यासाठी जवळपास 6,500 कोटी रुपये खर्च करण्यात येऊ शकतात. गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, एमएसएमई, शिक्षण, क्रेडिट कार्डाची थकबाकी, ग्राहक टिकाऊ कर्ज आणि उपभोग कर्ज असे एकूण आठ प्रकारच्या कर्जधारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मोरेटोरियमच्या 6 महिन्यांच्या मुदतीच्या कालावधीत चक्रवाढ व्याजातून साधारण व्याज कपात केल्यावर जी रक्कम शिल्लक राहणार आहे, ती कॅशबॅकच्या स्वरूपात कर्जदारांना परत केली जाणार आहे. ज्यांनी मोरेटोरियमचा फायदा घेतलेला आहे, त्यांना चक्रवाढ व्याज आणि साधारण व्याजामध्ये जी रक्कम शिल्लक राहणार आहे, तेवढी रक्कम परत मिळणार आहे.
उदाहरणार्थ मोरेटोरियमच्या 6 महिन्यांच्या कालावधीत तुम्ही 20 हजार रुपये भरलेले आहेत, म्हणजेच तुम्ही एकूण 1.20 लाख रुपये EMIच्या स्वरूपात जमा केलेले आहेत. समजा या 1.20 लाख रुपयांमध्ये 20 हजार रुपये व्याज आहे. व्याजावरील व्याजाच्या स्वरूपात 8 टक्के व्याजदराप्रमाणे वर्षाचे व्याज 1600 रुपये होते. अशा परिस्थितीत ग्राहकांना व्याजावरील व्याजाची परतफेड म्हणून 6 महिन्यांच्या EMIच्या रकमेवर सुमारे 800 रुपये कॅशबॅक मिळणार आहे. पण वेगवेगळ्या कर्जांवर वेगवेगळे व्याजदर आकारले जातात.
अर्णब गोस्वामींचं भाजपासोबतचं 'फॅमिली कनेक्शन' नेमकं आहे तरी काय?
वाचा सविस्तर-👉 https://t.co/q2ihKMoggP@arnabofficial9 @BJP4Maharashtra #BJP #ArnabGoswami #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 5, 2020
अर्णव गोस्वामीने रात्रभर खाल्ली पोलीस कोठडीची हवा! कोर्टाने सुनावली १४ दिवसांची कोठडी
वाचा सविस्तर-👉 https://t.co/aEDCRBvxJi@arnabofficial9 #MumbaiPolice #Raigadpolice #HelloMaharashtra #ArnabGoswami— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 5, 2020
एकदम बेस्ट! आता Amazonवरून बुक करा गॅस सिलिंडर; जाणून घ्या नेमकं कसं?
वाचा सविस्तर-👉 https://t.co/2tsfck5yPR@amazonIN #gascylinder #onlinemarket #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 5, 2020
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in