PNB ग्राहकांसाठी चांगली बातमी ! बँकेने ‘हे’ शुल्क केले कमी, तपशील येथे पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर आपण पंजाब नॅशनल बँकेचे (PNB) ग्राहक असाल तर आपल्यासाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेने कोरोना संसर्गाच्या वाढत्या घटना लक्षात घेता आणि Doorstep Banking आवश्यक असल्याचे विचारात घेऊन सर्विस चार्ज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. PNB ने आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी Doorstep Banking चे शुल्क कमी केले आहे. बँकेने आपल्या ट्विटर हँडलद्वारे ही माहिती दिली आहे.

आता घरी पैसे मागवण्यासाठी आकारले जाणार कमी शुल्क
आता PNB ग्राहकांना डोअरस्टेप बँकिंगद्वारे रोख रक्कम मिळविण्यासाठी केवळ 50 रुपये द्यावे लागतील. पूर्वी यासाठीचे शुल्क 60-100 रुपये असायचे. आपण घराबाहेर पडण्यास असमर्थ असाल आणि आपल्याला रोख रक्कम हवी असेल तर आपण घर बसल्या रोख रक्कम देखील मिळवू शकता. जवळजवळ सर्व बँका ही सुविधा देत आहेत. तथापि, यासाठी शुल्क आकारले जाते.

डोअरस्टेप बँकिंग सेवेसाठी येथे नोंदणी करा
जर तुम्हाला PNB च्या डोअरस्टेप बँकिंग सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्ही आधी नोंदणी करावी लागेल. हे लक्षात ठेवा की, मोबाइल नंबर आपल्या बँक खात्यासह नोंदविला गेला पाहिजे. यासाठीची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे-

<< स्वतःची नोंदणी करण्यासाठी आपण टोल-फ्री क्रमांकावर 1800-10-37-188 किंवा 1800-12-13-721 वर कॉल करू शकता.

<< आपण संगणकावरून www.psbdsb.in वर जाऊन आपली नोंदणी देखील करू शकता.

<< आपण मोबाइलमध्ये DSB मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करुन स्वत: ची नोंदणी करू शकता.

<< मोबाइल अ‍ॅप वर लॉग इन करा आणि आपल्या बँकेचे तपशील निवडा, आपल्याकडे व्हॅलिडेशन साठी OTP येईल, तो एंटर करा. व्हॅलिडेशन पूर्ण झाल्यावर बँकेचे नाव, खाते क्रमांक, खातेधारकाचे नाव, खाते प्रकार आणि शाखांचे नाव अ‍ॅप वर दिसून येईल.

जास्तीत जास्त 10,000 रुपये मागवू शकतो
कोणत्याही सार्वजनिक बँकेचे ग्राहक DSB अ‍ॅप / वेब पोर्टलचा वापर करून किंवा टोल फ्री क्रमांकावर कॉल करून रोख पैसे काढण्याची सेवा बुक करू शकतात. रिअल टाइम रोख पैसे काढणे उपलब्ध असेल. यासाठी ग्राहकाचे बँक खाते आधार किंवा डेबिट कार्डाशी जोडले जाणे आवश्यक आहे. प्रति व्यवहाराची मर्यादा किमान रू. 1000 आणि जास्तीत जास्त रु. 10,000 रु. असेल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group