PNB ग्राहकांसाठी खुशखबर; आता व्हिडिओ कॉलद्वारे जमा करा लाइफ सर्टिफिकेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पंजाब नॅशनल बँकेने (PNB) पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र किंवा लाइफ सर्टिफिकेट सादर करण्यासाठी व्हिडिओ कॉलची सुविधा सुरू केली आहे. यामुळे केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना महामारीच्या काळात लाइफ सर्टिफिकेट सादर करणे नेहमीपेक्षा सोपे होईल. PNB च्या नवीन व्हिडिओ बेस्ड ग्राहक ओळख प्रक्रियेअंतर्गत, पेन्शनधारकांना घरबसल्या सुरक्षितपणे लाइफ सर्टिफिकेट सादर करता येतील.

पंजाब नॅशनल बँकेने ट्विट केले की, लाइफ सर्टिफिकेट सादर करणे आता पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. याद्वारे तुम्ही तुमची कागदपत्रे व्हिडिओ कॉलद्वारे सबमिट करू शकता. 28 फेब्रुवारी 2022 ही शेवटची तारीख आहे.

अर्ज भरण्याची तारीख दुसऱ्यांदा वाढवली

सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाच्या देखरेखीखाली पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने अलीकडेच सर्व वयोगटातील केंद्रीय पेन्शनधारकांसाठी लाइफ सर्टिफिकेट सादर करण्याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 होती. पेन्शन विभागाने लाइफ सर्टिफिकेट दाखल करण्याची अंतिम तारीख दुसऱ्यांदा वाढवली आहे.

साधारणपणे, दरवर्षी 30 नोव्हेंबरपर्यंत पेन्शनधारकांना त्यांचे लाइफ सर्टिफिकेट बँक किंवा पेन्शन एजन्सीकडे जमा करावे लागते. कोरोनामुळे ही मुदत 30 नोव्हेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. त्यानंतर अलीकडेच 31 डिसेंबरची मुदत वाढवून 28 फेब्रुवारी 2022 करण्यात आली आहे. लाइफ सर्टिफिकेट सादर न केल्याने कोणाचेही पेन्शन थांबणार नाही, असे सरकारने म्हटले आहे.

अशा प्रकारे व्हिडिओ कॉलद्वारे कागदपत्रे जमा करता येतील

PNB वेबसाइट  https://www.pnbindia.in/ वर जा आणि लाइफ सर्टिफिकेट पर्याय निवडा.
येथे तुमचा खाते क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाका. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर पाठवलेला OTP टाका.
तुमचा आधार क्रमांक टाका आणि पुढे जाण्यासाठी अटी व शर्ती स्वीकारा.
आधार व्हेरिफिकेशनसाठी OTP टाका.
तुमचा पेन्शन प्रकार निवडा. तुम्ही नियमित पेन्शन निवडल्यास व्हिडिओ लाइफ सर्टिफिकेटसाठी ‘Submit Request’ वर क्लिक करा.
कौटुंबिक पेन्शनसाठी तुमचा रोजगार आणि वैवाहिक स्थितीची डिटेल्स एंटर करा आणि व्हिडिओ लाइफ सर्टिफिकेटसाठी ‘Submit Request’ वर क्लिक करा.
यानंतर लाइफ सर्टिफिकेटसाठी तुमची विनंती यशस्वीरित्या सबमिट केली जाईल.

Leave a Comment