नवी दिल्ली । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 22.55 कोटी खात्यांमध्ये 8.50 टक्के दराने व्याज जमा केले आहे. EPFO ने अधिकृत ट्विटर हँडलवर सांगितले की, 2020-21 या आर्थिक वर्षात आतापर्यंत 22.55 कोटी लोकांच्या खात्यात 8.50 टक्के दराने पैसे ट्रान्सफर केले आहेत. तुमच्या PF खात्यात पैसे आले की नाही हे तुम्ही अशा प्रकारे जाणून घेऊ शकाल.
अशा प्रकारे तुमचा PF बॅलन्स जाणून घ्या
SMS द्वारे- EPFO कडे रजिस्टर्ड मोबाइल नंबर वरून EPFO UAN LAN (भाषा) 7738299899 वर पाठवावा लागेल. LAN म्हणजे तुमची भाषा. इंग्रजीत माहिती हवी असल्यास LAN ऐवजी ENG लिहावे लागेल. त्याचप्रमाणे हिंदीसाठी HIN आणि तमिळसाठी TAM लिहायचे आहे. हिंदीमध्ये माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला EPFOHO UAN HIN लिहून मेसेज करावा लागेल.
मिस्ड कॉलद्वारे- तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही मिस्ड कॉलद्वारे तुमचा EPF बॅलन्स देखील जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर वरून 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल करावा लागेल.
वेबसाइटद्वारे- तुमचा बॅलन्स ऑनलाइन तपासण्यासाठी EPF पासबुक पोर्टलला भेट द्या. तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून या पोर्टलवर लॉग इन करा. यामध्ये, Download/View Passbook वर क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्यासमोर पासबुक उघडेल ज्यामध्ये तुम्ही बॅलन्स पाहू शकता.
UMANG App द्वारे- जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्हाला हवे तेव्हा अॅपद्वारे तुम्ही तुमचा EPF बॅलन्स तपासू शकता. यासाठी UMANG App ओपन करा आणि EPFO वर क्लिक करा. यामध्ये Employee Centric Services वर क्लिक करा आणि त्यानंतर View Passbook वर क्लिक करा आणि UAN आणि पासवर्ड टाका. रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर OTP येईल. तो एंटर केल्यानंतर आपण EPF बॅलन्स पाहू शकाल.