नवी दिल्ली । रेटिंग एजन्सी मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने कॅलेंडर वर्ष 2022 साठी भारताच्या विकास दराचा अंदाज 9.5% पर्यंत वाढवला आहे. मूडीजने यापूर्वी 7 टक्के विकास दराचा अंदाज दिला होता. 2023 साठी जीडीपी वाढीचा अंदाज 5.5 टक्के कायम ठेवण्यात आला आहे.
मूडीजने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, कोरोना महामारी आणि दुसऱ्या लाटेनंतर भारतीय अर्थव्यवस्था वेगाने सावरत आहे. मूडीजचा अंदाज RBI च्या अंदाजापेक्षा 60 बेसिस पॉइंट्सने जास्त आहे. 2022-23 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 7.8 टक्के राहण्याचा अंदाज RBI ने व्यक्त केला आहे.
कॅलेंडर वर्षासाठी जारी केलेल्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष 23 मध्ये 8.4 टक्के आणि आर्थिक वर्ष 24 मध्ये 6.5 टक्के वाढ होऊ शकते. मात्र , केंद्र सरकारच्या आर्थिक सर्वेक्षण, 2021-22 मध्ये, पुढील आर्थिक वर्षासाठी 8-8.5 टक्के वास्तविक जीडीपी वाढीचा दर अंदाज वर्तवण्यात आला होता, तर अर्थसंकल्पात नॉमिनल जीडीपी वाढीचा दर 11.1 टक्के अंदाजित करण्यात आला होता.
मूडीजने 23 फेब्रुवारी रोजी आपल्या ग्लोबल मॅक्रो आउटलुक 2022-23 रिपोर्टमध्ये म्हटले आहे, “भारतातील सेल्स टॅक्स कलेक्शन, रिटेल एक्टिव्हिटी आणि PMI ताकद दर्शवते. मात्र, इंधनाच्या वाढत्या किंमती आणि पुरवठ्यातील अडचणींचा अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.”
मूडीजने म्हटले आहे की, “इतर अनेक देशांमधील कॉन्टॅक्ट बहुल सर्विसेज सेक्टर्स मधील रिकव्हरी मंद आहे, मात्र ओमिक्रॉनचा प्रभाव कमी झाल्यामुळे वेग वाढला पाहिजे,”. कोविडच्या परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे, शाळा आणि महाविद्यालये उघडण्यासह बहुतांश निर्बंध हटवून देश सामान्य स्थितीकडे वाटचाल करत आहे.