Good news ! कोरोना रुग्णांना मोठा दिलासा, Zydus cadila च्या Virafin औषधाला मंजुरी

0
125
medicine
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशातील कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या ही चिंतेची बाब ठरली आहे. कोरोनाला हटवण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याबरोबरच लसीकरण मोहीमही हाती घेण्यात आली आहे. दरम्यान कोरोनाशी लढण्यासाठी आता सरकारने आणखी एका औषधाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी ही बातमी दिलासादायक ठरली आहे. केंद्र सरकारने कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी झायडस कॅडीलाच्या विराफिन या अँटीव्हायरस औषधाला मंजुरी दिली आहे.

कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी आपात्कालीन मंजुरी द्यावी. अशी मागणी कंपनीने ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाकडे केली होती. आता औषधाला मंजुरी दिली आहे आता या औषधाचा कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापर केला जाणार आहे. झायडस कॅडिलाचं इंटरफेरॉन अल्फा – 2 बी Interferon alpha-2b म्हणजे Virafin या अँटिव्हायरल औषध. PegIFN म्हणूनही हे औषध ओळखलं जातं.

कोरोना रुग्णांवर प्रभावी

दरम्यान हे औषध करोना रुग्णांसाठी प्रभावी असल्याचे कंपनीचे मत आहे. या औषधामुळे रुग्ण लवकर बरा होतो असा दावा या कंपनीने केला आहे. या औषधाची करोना रुग्णांवर चाचणी गेली तरी या चाचणीत ज्या रुग्णांना औषध देण्यात आले त्यापैकी 91.1 15 टक्के रुग्णांची rt-pcr चाचणी सात दिवसात निगेटिव्ह आणि असं कंपनीने सांगितले आहे. औषधामुळे आजारामुळे निर्माण होणारी गुंतागुंत ही कमी होते शिवाय रुग्णाला ऑक्सिजनवर ठेवण्याचा कालावधी कमी होतो असा कंपनीने सांगितले आहे.

दरम्यान झायडस कॅडीला ही अहमदाबादमधील औषध कंपनी आहे. हिपॅटायटीस सी साठी औषध तयार करण्यात आलं होतं. दहा वर्षांपूर्वी यकृता संबंधी आजारावर उपचारासाठी औषधाला परवानगी देण्यात आली होती. आता हे औषध कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यास परवानगी द्यावी अशी मागणी कंपनीने केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here