नवी दिल्ली । नोकरदारांसाठी दिलासादायक बातमी येत आहे. राज्य कर्मचारी विमा महामंडळाच्या (ESIC) मेडिकल योजनेची (Medical benefit) व्याप्ती वाढू शकते, अशी बाटली समोर आली आहे. या योजनेअंतर्गत 30 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश केला जाऊ शकतो. सध्या, ESIC चा लाभ केवळ 21 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच मिळू शकतो. हा नवीन प्रस्ताव ESIC बोर्डाच्या बैठकीत ठेवला जाईल, जेथे मंजुरीनंतर तो मोदी सरकारकडे पाठवला जाईल.
मीडिया रिपोर्टनुसार, जर हा प्रस्ताव पास झाला तर 20-25 टक्के कर्मचारी या कार्यक्षेत्रात येतील. ESIC बोर्डाची बैठक सप्टेंबरमध्ये प्रस्तावित आहे. ESIC योजनेअंतर्गत येणारे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय अधिक चांगले उपचार मिळवू शकतील.
ESIC योजनेअंतर्गत उपलब्ध लाभ
सध्या, ESIC योजनेच्या सदस्याच्या पगारामध्ये 0.75 टक्के हिस्सा घेतला जातो, तर 3.25 टक्के नियोक्त्याकडून घेतला जातो. ESIC योजनेअंतर्गत देशात 6 कोटी कर्मचारी आहेत. सध्या या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याच्या मृत्यूवर देण्यात येणाऱ्या लाभांमध्ये वाढ करण्यात आली आहे. आता ग्रॅच्युइटी भरण्यासाठी किमान सेवा आवश्यक नाही. EPF आणि MP कायद्यातील तरतुदींनुसार कौटुंबिक पेन्शन दिले जात आहे. जर कर्मचारी आजारी असेल आणि कार्यालयात येत नसेल तर एकूण वेतनापैकी 70 टक्के रक्कम वर्षातील 91 दिवस आजारपण लाभ म्हणून दिली जाते.
ESIC च्या नवीन योजनेबद्दल जाणून घ्या
ESIC ची नवीन योजना कोविड पेन्शन रिलीफ स्कीम (CPRS) कोविडमुळे मरण पावलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला आजीवन पेन्शन देते. त्याची रक्कम किमान 1800 रुपयांपासून ते मृत कामगारांच्या सरासरी दैनंदिन वेतनाच्या 90% पर्यंत असू शकते. ही योजना 24 मार्च 2020 पासून दोन वर्षांसाठी लागू करण्यात आली आहे.