कॅलिफोर्निया । गूगलने (Google) चीनला चांगला दणका दिला आहे. गूगलने चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केली आहेत. त्यामुळे चीनला याचा मोठा फटका बसणार आहे. चुकीच्या आणि खोट्या बातम्या पसरवत असल्याचे कारण देत गूगलकडून ही कारवाई करण्यात आली आहे.गूगलकडून सांगण्यात आले आहे .
गूगलने हटविलेले यूट्यूब चॅनेल्स स्पॅमी आणि बिगर राजकीय कंटेन्ट पोस्ट करत होते. तसेच, यामधील काही भाग राजकारणाशी संबंधित होता. दिशाभूल करणारे व्हिडिओ चीनने यूट्यूब प्लॅटफॉर्मवर शेअर केल्याचे गुगलचे म्हणणं आहे. यूट्यूबवरील विविध चॅनेल्स तपासणीच्या कामादरम्यान गूगलला काही व्हिडिओ चॅनेल संदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर गूगलने योग्य ती खातरजमा करुन एप्रिल ते जून या तिमाहीत २५०० पेक्षा जास्त चॅनेल यूट्यूबवरून हटवले आहेत. आपल्या तिमाही अहवालात गूगलने यासंदर्भात माहिती दिली आहे.
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर अमेरिका आणि चीनमधील संबंध बिघडले गेले आहेत. मतभेद अगदी टोकाला गेले आहेत. त्यामुळे भारतानंतर अमेरिकेने चीनच्या TikTok वर बंदी घातली होती. तसेच अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून खबरदारी घेण्यात आली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”