Google Pay Loan Scheme | G Pay वरून मिळणार 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Google Pay Loan Scheme | आज काल डिजिटल इंडियाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे .अनेक गोष्टी आता डिजिटलायजेशनच्या पद्धतीने होत आहेत. पीएम मोदींनी डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहिलेले होते. ते पूर्ण होत आहे. त्यामुळे आता आर्थिक क्षेत्रात देखील डिजिटलायझेशन आलेले आहेत. त्यानंतर गुगल पे आणि फोन पे यांसारखे थर्ड पार्टी ॲप आले. आणि ऑनलाईन पेमेंट करणे खूप सोपे झालेले आहे. गुगल पे (Google Pay Loan Scheme) किंवा फोन पेच्या माध्यमातून आपल्याला दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला पैसे पाठवता येतात. किंवा पैसे घेता देखील येतात. परंतु जे लोक गुगल पे वापरतात. त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता गुगल पेच्या माध्यमातून तुम्हाला कर्ज देखील मिळेल.

गूगल इंडियाने आता google पे मध्ये एक नवीन फीचर लॉन्च केलेले आहे. यामध्ये पात्र असणारे ग्राहक गुगल पेद्वारे एक लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज घेऊ शकतात. यासाठी त्यांना कोणत्याही बँकेत जाण्याची गरज नाही. आता हे कर्ज नक्की कोणाला मिळणार? कर्ज मिळणासाठी कोणती कागदपत्रे लागतात? अर्ज कसा करावा? किती व्याजदर असेल? या सगळ्याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

गुगल पे कर्ज योजना काय आहे? | Google Pay Loan Scheme

गुगल इंडियाने नुकतेच यावर्षी गुगल पे यूजरसाठी एक लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज देण्याची सुविधा लॉंच केलेली आहे. यामध्ये तुम्ही जर गुगल पे नियमित वापरत असाल, तर तुम्हाला यातून खूप लवकर कर्ज मिळू शकते. यामध्ये तुम्हाला कोणत्याही कागदपत्राची किंवा बँकेत जाण्याची गरज नाही.

गुगल पे कर्ज काय आहे ?

गुगल पेद्वारे तुम्हाला कर्ज हे तुमच्या आर्थिक व्यवहार आणि क्रेडिट स्कोरच्या आधारावर दिले जाते. तुम्ही गुगल ॲप द्वारे त्यासाठी अर्ज करू शकता. डीएमआय बँक आयडीएफसी फर्स्ट बँक आणि फेडरल बँक यांसारख्या गुगल पे भागीदार बँकांकडून कर्ज उपलब्ध आहे. आणि या ॲपद्वारे तुम्ही मासिक हप्ते भरू शकता.

गुगल पे कडून कर्ज घेण्याची पात्रता काय आहे ?

जे लोक google सातत्याने वापरतात. त्यांचा क्रेडिट स्कोर चांगला आहे. तसेच ज्या लोकांनी कोणत्याही बँकेचे किंवा वित्तीय संस्थेचे याआधी कर्ज घेतलेले नाही. ते यासाठी अर्ज करू शकतात.
गुगल पे द्वारे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला नियमित उत्पन्नाचा दाखला दाखवावा लागतो.

गुगल पे करून कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक खाते माहिती आणि आयएफएससी कोड
मोबाईल नंबर गुगल पे खात्याची लिंक असणे गरजेचे आहे.

गुगल पे वरून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्ज कसा करावा ?

  • तुम्ही तुमच्या मोबाईलवर गुगल पे ॲप चालू करा आणि त्यावर लॉगिन करा.
  • त्यानंतर तुम्ही व्यवसाय किंवा पेमेंट टॅबच्या खाली असलेल्या कर्ज विभागात जा.
  • तुम्ही जर पात्र असाल तर तुमची संपूर्ण हिस्टरी आणि क्रेडिट स्कोर तिथे दिसेल.
  • त्यानंतर कर्जाचे रक्कम व्याजदर आणि पेमेंट या सगळ्या अटी तपासा.
  • अर्ज सुरु करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्या आधार आणि पॅन कार्ड क्रमांक बँक खाते क्रमांक आयएफएससी कोड यांसारखी माहिती द्या.
  • त्यानंतर ईएमआय योजना निवडा आणि अटी आणि शर्तीना सहमती द्या.
  • नंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल हा ओटीपी टाकल्यानंतर तुमच्या तुमच्या अर्ज सबमिट केला जाईल.