हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल बाजारात सध्या Google Pixel 7a आणि OnePlus 11R हे दोन मोबाईल दाखल झाले असून एकाच किंमतीत मिळणाऱ्या ह्या दोन मोबाईलपैकी नेमका कुठला मोबाईल घ्यावा असा प्रश्न खरेदीदारांच्या मनात नक्कीच निर्माण होतो. त्यामुळे आज आम्ही या दोन्ही मोबाईलच्या फीचर्सबाबत सांगणार आहोत. त्यानंतर तुम्हीच ठरवा कि कोणता मोबाईल तुमच्यासाठी बेस्ट आहे.
डिस्प्ले:
Google Pixel 7a ला 6.1-इंचाचा OLED डिस्प्ले मिळतो जो 90hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो तर OnePlus 11R ला 6.7-इंचाचा OLED डिस्प्ले मिळतो जो 120hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. म्हणजेच, गेमिंग आणि जड कामाच्या दरम्यान, OnePlus फोन तुम्हाला चांगला रिफ्रेश दर देईल.
कॅमेरा-
फोटोग्राफीच्या बाबतीत, Google Pixel 7a मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, ज्यामध्ये 64MP मुख्य कॅमेरा आणि 13MP अल्ट्रावाइड सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 32MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. दुसरीकडे, OnePlus 11R मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे ज्यामध्ये 50MP Sony IMX890 कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड आणि 2MP मायक्रो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोर समोरील बाजूला 16MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
बॅटरी-
OnePlus बॅटरीच्या बाबतीत चांगली आहे कारण ती 100W जलद चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी मिळते , तर Pixel 7a 18W जलद चार्जिंगसह 4,385mAh बॅटरीसह मिळते . पिक्सेल स्मार्टफोन बॅटरी ऑप्टिमायझेशनच्या बाबतीत उत्तम आहे.
प्रोसेसर –
Google Tensor G2 चिपसेट Google Pixel 7a मध्ये उपलब्ध आहे तर Snapdragon 8th Plus Generation One चिपसेट Oneplus 11R मध्ये सपोर्ट मिळते . दोन्ही फोन Android 13 सह येतात.