Google करणार लाखो वापरकर्त्यांचे Gmail खाते बंद! यात तुमचे अकाऊंट असेल का? जाणून घ्या

0
1
Gmail
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| तुम्ही जर Gmail वापरत असाल परंतु बऱ्याच काळापासून ते उघडले नसेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण, 1 डिसेंबरपासून गुगल लाखो निष्क्रिय Gmail खाती बंद करणार आहे. ही खाती वापरात नसल्यामुळे कायमस्वरूपी बंद करण्यात येतील. ज्या वापरकर्त्यांनी खूप दिवसांपासून आपले Gmail खाते उघडलेच असेल तर त्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे आज पासूनच तुम्ही तुमच्या Gmail खात्यावर सक्रिय रहा.

सध्या अनेक Gmail अकाउंट अशी आहेत, जी गेल्या दोन वर्षांपासून उघडण्यात आलेली नाही. किंवा त्यांचा वापरही करण्यात आलेला नाही. त्यामुळे अशा अकाउंटवर गुगल कारवाई करणार आहे. गुगलने ही कारवाई केल्यानंतर वापरकर्त्यांना इतर सेवा ही गमवाव्या लागणार आहेत. हे खाते हटवण्यापूर्वी गुगल तुम्हाला ईमेल द्वारे आवश्यक माहिती देईल जेणेकरून तुम्हाला खाते हवे असल्यास ते सेव्ह करता येईल. मात्र असे न केल्यास गुगल तुमचे खाते कायमचे बंद करेल.

दरम्यान, गुगल ही कारवाई अशा अकाउंटबरोबर करणार आहे, जी गेल्या दोन वर्षांपासून वापरण्यात आलेली नाही. परंतु तुम्हाला ही कारवाई आपल्या अकाउंट बाबत करून घ्यायची नसेल तर त्यासाठी Gmail वर सक्रिय राहणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला कंपनीच्या विविध सेवा वापराव्या लागतील. तसेच त्या अकाउंटवरून यूट्यूब पाहणे, फोटो शेअर करणे, मेल पाठवणे, या गोष्टी कराव्या लागतील. असे केल्यास गुगलकडून Gmail अकाउंट बंद करण्यात येणार नाही.