तुमच्या गाडीला स्क्रॅच पडले आहे? तर ही भन्नाट ट्रिक नक्की करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपली गाडी नेहमी सुंदर, स्वच्छ दिसावी तिला कोणतेही स्क्रॅच पडू नये असे सर्वांनाच वाटत असते. त्यासाठी लोक तशी आपल्या गाडीची काळजीही घेतात. मात्र तरी देखील कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अनकेदा गाडीला स्क्रॅच पडतात. आणि आपल्या सुंदर गाडीची वाट लागते. हे स्क्रॅच पुन्हा नीट करण्यासाठी आपल्याला जास्त पैसे देखील मोजावे लागतात. मात्र तुम्हाला हे माहित आहे का आपण गाडीला पडलेले स्क्रॅच घरबसल्या देखील घालवू शकतो. यासाठी फक्त एक भन्नाट ट्रिक करायची गरज आहे.

सर्वात पहिल्यांदा एका बाऊलमध्ये समप्रमाणात खोबरेल तेल आणि विनेगर घेऊन त्याचे एकत्र मिक्स करा. त्यानंतर एक सुती कापड घ्या त्यावर थोडे हे मिश्रण घेऊन गाडीवर सातत्याने हळुवारपणे फिरवत राहा. स्क्रॅच पडले की लगेच ही कृती करणे गरजेची आहे. जर गाडीला ओरखडे छोटे पडलेले असतील तर ते या प्रयोगाने नक्की निघून जातील. आणि ते जर मोठे असतील तर आपल्याला गॅरेजमध्ये जाऊनच ते नीट करावे लागतील.

https://www.instagram.com/reel/CtZEXdxpCdE/?igshid=MzRlODBiNWFlZA==

दुसरा प्रयोग असा की,गाडीवरील स्क्रॅच काढण्यासाठी सॅण्ड पेपरचा वापर करा. सॅण्ड पेपर दहा ते पंधरा मिनिटं पाण्यात भिजवत ठेवा. त्यानंतर गाडीवरील स्क्रॅचवर घासून घ्या. सॅण्ड पेपर स्क्रॅचवर जोमाने घासू नका. नाहीतर गाडीचा रंग निघेल. सॅण्ड पेपर घासून काढल्यावर सुती कापडाने पुसून काढा. यामुळे स्क्रॅच कमी होईल. तुम्ही जर हे घरगुती उपाय करून बघितले तर नक्कीच तुमचा खर्च देखील वाचेल.

बाहेरील गॅरेज मध्ये गाडीचे रिपेरिंग करण्यासाठी सर्वात जास्त पैसे आकारले जातात परंतु गाडीच्या काही गोष्टी आपल्याला घरबसल्या देखील नीट करता येऊ शकतात फक्त त्यासाठी आपल्याला योग्य ती क्रिया माहीत असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण वेगवेगळे व्हिडिओज पाहून किंवा ऑनलाईन माहिती जाणून घेऊ शकतो.