हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) अगोदर केंद्र सरकार (Cental Government) आपल्या मतदारांसाठी मोठमोठ्या घोषणा करत आहे. यानिमितच केंद्राकडून बँक कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट देण्यात आली आहे. नुकताच केंद्र सरकारने बँक कर्मचाऱ्यांना 17 टक्के पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यासह एका आठवड्यातून केवळ 5 दिवस कामावर जाण्याच्या निर्णयाला देखील मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता बँक कर्मचाऱ्यांना काम कमी आणि पगार जास्त असणार आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये (Bank Employees) आनंदाचे वातावरण पसरले आहे.
केंद्र सरकारने घेतले हे मोठे निर्णय
सध्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जवळ येऊ लागले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार नागरिकांच्या हिताच्या घोषणा करण्यावर भर देत आहे. यावेळी सरकारने बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे लवकरच आता कर्मचाऱ्यांच्या पगारात 17 टक्क्यांनी वाढ होणार आहे. या कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबर 2022 पासून पगार वाढणार आहे. तसेच या कर्मचाऱ्यांना आठवड्यातील फक्त पाचच दिवस काम करावे लागेल. यामुळे सरकारी बँकांमध्ये सुमारे आठ लाख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पगारवाढीचा आणि आठवड्यातून एक दिवस अतिरिक्त रजेचा लाभ मिळणार आहे.
केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर 2022 पासून 17 टक्क्यांनी पगार वाढ केल्यामुळे या कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळण्याची देखील अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुख्य म्हणजे बँकेतील महिला कर्मचाऱ्यांना देखील महिन्यातील एक दिवस प्रमाणपत्रांना देता वैद्यकीय रजा घेता येणार आहे. सांगितले जात आहे की, नुकताच इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि बँक कर्मचारी संघटनांमध्ये 17 टक्के वार्षिक पगारवाढीचा करार झाला आहे. ज्यामुळे बँकांवर सुमारे 8285 कोटी रुपयांचा बोजा वाढणार आहे.
शनिवारी बँका चालू की बंद?
दरम्यान सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना दर शनिवारी सुट्टी देण्यास ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशनने मंजुरी दिली आहे. सध्याच्या घडीला देशातील बँकांना फक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. मात्र केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे बँकांमध्ये 5 दिवसच वर्किंग डे असणार आहेत. मात्र यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामाचा भार वाढू शकतो असे देखील वर्तवले जात आहे.