कोल्हापूर प्रतिनिधी । लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याप्रकरणी पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. सत्ताप्पा चौगुले असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. हा कर्मचारी राधानगरी पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनेत डाटा एंट्रीच काम करतो. त्याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
साताप्पा कृष्णा चौगुले वय वर्ष बत्तीस असं या संशयित आरोपीचं नाव असून त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं आज अटक केली आहे. तक्रारदार यांनी शासनाच्या सबसीडी मधून जनावरांचा गोठा बांधला होता. या सबसिडीचा दुसरा चेक तक्रारदार यांच्या खात्यात जमा करण्यासाठी साताप्पा चौगुले या डाटा एंट्री ऑपरेटरने संबंधित क्लार्कला लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिल होत.
या प्रकरणी लाच लुचपत पतिबंधक विभागाने चौगुलेला अटक केली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जितेंद्र पाटील सहाय्यक फौजदार श्याम बुचडे पोलीस नाईक नवनाथ माने यांच्या पथकाने केली आहे.