हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ऑफिस वर्क करणाऱ्यांसाठी त्यांचा कामाचा वेळ हा ठरलेला असतो. परंतु आता देशातील सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी महत्त्वाची सूचना आलेली आहे. आता ऑफिसला उशिरा पोहोचल्यावर केंद्र सरकार कारवाई करणार असल्याचा आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आलेला आहे. जर तुम्हाला ऑफिसला यायला पंधरा मिनिटापेक्षा जास्त उशीर झाला, तर माफ केले जाणार नाही. त्यांना कारवाईसाठी तयार राहावे लागेल. असे सांगण्यात आलेले आहे.
देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत ऑफिसमध्ये कामासाठी उपस्थित राहायचे असते. आणि आपल्या हजेरी लावायची असते. आता केंद्र सरकारने वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक स्क्रीनचा वापर करण्यास सांगितलेले आहे. कोरोना काळापासून ही बायोमेट्रिक सिस्टीम बंद करण्यात आली होती. परंतु आता ही पुन्हा एकदा चालू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे
केंद्र सरकारच्या डीओपीटी विभागाने जास्तीत जास्त 15 मिनिट उशीर झाल्यावर माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल म्हणजे सव्वा नऊ नंतर ऑफिसला येणाऱ्यांना अर्धा दिवस जाणार आहे.
केंद्र सरकारची ऑफिसची सकाळी 9 ते सायंकाळी 5 : 30 वाजेपर्यंत आहे. परंतु कर्मचारी उशिरा येणे आणि लवकर जाण्याचे प्रकार सुरू असतात. त्यामुळे आता ऑफिसची ही वेळ निश्चित करण्यात आलेली आहे. म्हणजेच आता साडेनऊ नंतर उपस्थित राहणाऱ्यांचा सर्रास हाफ डे लागणार आहे. त्यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या ऑफिसची वेळ तंतोतंत पाळावी लागणार आहे. अन्यथा त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.