Government Employee | सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी जाणार आनंदात; सरकारने जाहीर केला 30 दिवसांचा बोनस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Government Employee | दिवाळी अगदी तोंडावर आलेली आहे. आणि या दिवाळीच्या आधी केंद्र सरकारने अनेक कर्मचाऱ्यांना गिफ्ट दिलेले आहे. अशाच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता केंद्रात सरकारने कर्मचाऱ्यांना 30 दिवसांचा बोनस देण्याची घोषणा केलेली आहे. केंद्र सरकारच्या पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 2023-24 या आर्थिक वर्षासाठी हा 30 दिवसांचा नॉन प्रॉडक्टिव्हिटीचा लिंक्ड बोनस देण्यात येणार आहे. याआधी 10 ऑक्टोबर रोजी देखील अर्थ मंत्रालयाच्या विभागाने त्यांच्या आधी सूचनेत ही माहिती दिलेली होती. याला नॉन प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस किंवा ऍड हॉक बोनस असे देखील म्हणतात.

कोणत्या कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार | Government Employee

मंत्रालयाने यासंदर्भात एक अधिसूचना केलेली आहे. त्यानुसार 2023-24 आर्थिक वर्षासाठी जे उमेदवार पात्र आहेत. त्यांना त्यांच्या पगारा एवढा 30 दिवसांचा बोनस देणार आहे. यामध्ये पात्र कर्मचाऱ्यांमध्ये गट ब आणि राजपत्रित कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच बोनस मोजणीसाठी कमाल मासिक वेतन हे 7 हजार रुपये निश्चित करण्यात आलेले आहे. हा बोनस केंद्रीय निमलष्करी दल आणि सशस्त्र दलाच्या जवानांना देखील देण्यात येणार आहे.

31 मार्च 2024 पर्यंत जे लोक सेवेत आहेत. तसेच त्यांनी या 2023-24 या वर्षांमध्ये सलग सहा महिने सेवा दिलेली आहे. अशा केंद्रीय कर्मचाऱ्यांना हा बोनस मिळणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी एकापेक्षा कमी काळ सेवा दिलेली आहे. त्यांना त्यांच्या पगाराच्या आधारे हा बोनस मिळणार आहे

तसेच ज्या मजुरांनी सलग 3 वर्ष किमान 240 दिवस कॅज्युअल मजूर म्हणून काम केलेले आहे. ते देखील या बोनससाठी पात्र असणार आहेत. या कामगारांना दर महिन्याला 1200 रुपये आधारे बोनस दिला जाणार आहे. सणासुदीच्या काळात खर्च वाढतो त्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्थिती सुधारावी आणि त्यांना चांगला सण साजरा करता यावा. यास उद्देशाने हा बोनस दिला जाणार आहे.