Government Employment Generator Scheme | केंद्र सरकारच्या या योजना देतात तरुणांना रोजगार, तुम्हाला माहितीये का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Government Employment Generator Scheme | आपले सरकार हे समाजातील प्रत्येक घटकाचा, प्रत्येक व्यक्तीचा विचार करून नवनवीन योजना आणत असतात. जेणेकरून प्रत्येक माणूस हा त्याच्या आयुष्यामध्ये प्रगती करू शकतो. अगदी तरुणांच्या रोजगारासाठी देखील सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत. ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी अनेक योजना सरकारच्या आहेत. ज्याचा लाभ देखील अनेक लाखो लोकांनी घेतलेला आहे. परंतु अद्यापही अनेक लोकांना या योजनाबद्दल माहित नाहीये. तर आज आपण केंद्र सरकारच्या अशा काही योजना जाणून घेणार आहोत ज्या तरुणांना रोजगार उपलब्ध करतात.

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. (Government Employment Generator Scheme) ही योजना निर्भर भारत पॅकेज 3.4 चा एक भाग म्हणून सुरक्षा लाभांस नवीन रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन देणं, त्याचप्रमाणे कोविड सारख्या साथीच्या आजारांदरम्यान रोजगार गेलेल्यांना पुन्हा रोजगार उपलब्ध करून देणे. यासाठी ही योजना आणलेली आहे. केंद्र सरकारने ही योजना 1 ऑक्टोबर 2020 पासून सुरू केलेली आहे.

पंतप्रधान रोजगार प्रोत्साहन योजना

नवीन रोजगार निर्माण करणार्‍या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने 2016 रोजी ही पंतप्रधान रोजगार प्रोत्साहन योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत देखील आतापर्यंत अनेक लोकांना नोकरी मिळालेली आहे.

राष्ट्रीय करियर सेवा योजना | Government Employment Generator Scheme

करियर समुपदेशन, व्यावसायिक मार्गदर्शन, कौशल्य विकास अभ्यासक्रमाची माहिती त्याचप्रमाणे शिकाऊ उमेदवारांना प्रशिक्षण इत्यादी विविध करिअरच्या संधी देण्यासाठी सरकारने ही योजना चालू केली आहे. या योजनेतील महत्त्वाचे घटक आहेत. ते म्हणजे एससीएस गेटवे, मॉडेल करिअर सेंटर, आणि रोजगार केंद्राचे इंटरलिंकिंग करणं यामुळे लोकांना नोकरी शोधणे खूप सोपे जाते.

पंतप्रधान गरीब कल्याण रोजगार अभियान

सरकारची गरीब कल्याण रोजगार अभियान ही 125 दिवसांची मोहीम होती. 2020 मध्ये पंतप्रधानांनी ही योजना सुरू केली होती या अभियानाचे उद्दिष्ट कोविड-19 च्या महामारीच्या साथीने प्रभावी झालेल्या नागरिकांना ज्या काही रोजगारात अडचणी येत होत्या. त्यासाठी सरकारने सुरू केलेली ही मोहीम होती