बर्फाने करा चेहऱ्याची मालिश; त्वचेचा या सर्व समस्या होतील दूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Skin Care Tips| उन्हाळा सुरू झाला की चेहऱ्यावर मुरमांचे प्रमाणही वाढायला सुरुवात होते. यात तुम्ही जर रोज मेकअप करत असाल तर यामुळे चेहरा आणखीन ड्राय होत जातो. परिणामी यामुळे चेहऱ्यावरील तेज निघून जाते. परंतु अशावेळी तुम्ही कोणत्याही महागड्या क्रीम वापरण्याऐवजी चेहऱ्यावर फक्त बर्फ लावून सर्व समस्या दूर करू शकता. तुम्ही आठवड्यातून दोन वेळा जरी चेहऱ्यावर बर्फ लावला तर याचे अनेक फायदे तुम्हाला दिसून येतील. हे फायदे नक्की कोणकोणते असतील एकदा वाचा..

चेहऱ्यावरील मुरूम जातील..

तुमच्या चेहऱ्यावर लहान लहान मुरूम आले असतील तर रोज रात्री झोपताना चेहऱ्यावर बर्फ चोळत जावा. अर्धा तास जरी तुम्ही तुमच्या चेहऱ्याची बर्फाने मालिश केली तर काही आठवड्यांमध्ये चेहऱ्यावरील मुरूम निघून जातील. तसेच या मुरूमांचे जे डाग असतील ते देखील गायब होतील. परंतु तुमचा चेहरा खूपच ड्राय असेल तर आठवड्यातून फक्त दोनच वेळा चेहऱ्याची बर्फाने मालिश करा.

चेहऱ्यावर ग्लो येईल..

कामानिमित्त तसेच अनेक वेगवेगळ्या कारणांसाठी आपण सतत घराच्या बाहेर फिरत असतो. त्यामुळे चेहऱ्यावर एक काळपट थर जमा होतो. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील ग्लो पूर्णपणे गायब होतो. हा ग्लो पुन्हा आणायचा असेल तर तुम्ही चेहऱ्यावर बर्फ लावू शकता. बर्फाने चेहऱ्याची मालिश केल्यास तुमचा चेहरा हळूहळू उजळू लागेल.

सुरकुत्या निघून जातील..

बर्फाच्या मदतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवू शकता. तुम्ही रोज रात्री झोपताना चेहऱ्याची बर्फाने मालिश केली तर डोळ्याखाली दिसत असलेले डार्क सर्कल तसेच चेहऱ्यावर असलेल्या सुरकुत्या निघून जातील. तसेच नवीन सुरकुत्या देखील चेहऱ्यावर येणार नाहीत.

महत्वाचे बाब म्हणजे, तुमच्या चेहऱ्याची स्किन अत्यंत संवेदनशील असेल तर तुम्ही चेहऱ्यावर बर्फ लावू नका. यामुळे तुमचा चेहरा लालसर पडेल. तसेच तुमच्या त्वचेवरील पेशींना नुकसान होईल. त्यामुळे अशी कोणतीही कृती करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.