Kidney Stones : छोट्याशा लिंबामुळे गळून पडेल किडनी स्टोन; प्रभावी फायद्यासाठी ‘असे’ करा सेवन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kidney Stones) आपल्या शरीरात अनेक अवयव असे आहेत जे आपल्याला निरोगी आयुष्य प्रदान करण्यासाठी कार्यरत असतात. यांपैकी एक म्हणजे किडनी अर्थात मूत्रपिंड. रक्त शुद्धीकरणापासून ते रक्ताभिसरण नियंत्रित करण्यापर्यंत किडनी आपल्याला मदत करत असते. मात्र, जेव्हा रक्तामध्ये अधिक कचरा जमा होतो तेव्हा किडनी स्टोनची समस्या उद्भवते. अशा परिस्थितीत लघवीची मात्रा कमी होते आणि किडनीत क्रिस्टल तयार होतात. यामुळे तयार होणाऱ्या दगडांचा आकार कालांतराने वाढत जातो याला ‘किडनी स्टोन’ असे म्हणतात.

आज आपण किडनी स्टोन का होतो? त्याची लक्षणे काय याविषयी माहिती घेणार आहोत. शिवाय एका अशा पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही किडनी स्टोनपासून मुक्ती मिळवू शकता.

किडनी स्टोन का होतो? (Kidney Stones)

अनेक लोक दिवसभरातून अत्यंत कमी पाणी पितात. या सवयीमुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता असते. याशिवाय काही लोकांना अनुवंशिक स्वरूपामध्ये देखील हा त्रास होऊ शकतो. इतकेच नव्हे तर वारंवार मूत्रमार्गात संक्रमण होणे, व्हिटॅमिन सी किंवा कॅल्शियमच्या गोळ्यांचे अतिसेवन, लठ्ठपणा यामुळे देखील किडनी स्टोनची होते.

किडनी स्टोनची लक्षणे काय?

  • मळमळणे आणि उलटी होणे
  • भूक न लागणे (Kidney Stones)
  • अशक्तपणा येणे
  • सतत लघवीला होणे
  • सांधेदुखी
  • डोकेदुखी व मायग्रेन
  • हाय ब्लड प्रेशर
  • श्वसनाच्या समस्या
  • त्वचेच्या समस्या

किडनी स्टोनवर घरगुती उपाय

किडनी स्टोनवर जालीम ठरतील अशी बाजारात अनेक औषधे उपलब्ध आहेत. मात्र जर घरच्या घरी अगदी ५ रुपयात किडनी स्टोनपासून मुक्ती मिळणार असेल तर… ? (Kidney Stones) आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे कसं काय शक्य आहे? तर मित्रांनो काही घरगुती उपाय इतके प्रभावी असतात की तुम्हाला निरोगी आयुष्य अगदी सहज प्रदान करू शकतात. या औषधांमध्ये लिंबाचा समावेश आहे.

एक छोटा लिंबू तुमच्या आरोग्याशी संबंधित अनेक व्याधींवर प्रभावीपणे काम करू शकतो. कारण यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. तसेच कॅल्शियम, पोटॅशियम, फायबर, कॅन्सर विरोधी, दाहक विरोधी, अँटी मायक्रोबियल, सायट्रेट गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे किडनी स्टोनचा विकास लिंबू रोखू शकतो. यासाठी लिंबाचा वापर कसा करावा? हे जाणून घ्या. (Kidney Stones)

कोमट पाणी आणि लिंबू

शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी लिंबू अत्यंत प्रभावी आहे. त्यामुळे दररोज १ ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस पिळून प्या. यामुळे किडनीच्या कोणत्याही आजाराने तुम्ही ग्रासले असाल तर तुम्हाला निश्चित अराम मिळेल. मात्र, यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

ॲपल साइडर व्हिनेगर आणि लिंबू

(Kidney Stones) ॲपल साइडर व्हिनेगरमध्ये असलेले ऍसिटिक ऍसिड किडनी स्टोनची वाढ थांबवते. मात्र, याच्या प्रभावी फायद्यांसाठी व्हिनेगरमध्ये लिंबू मिसळून प्या. दोन्ही पदार्थ १ – १ चमचा मिसळून दिवसातून ३ ते ४ वेळा प्या. यामुळे किडनी स्टोन पडून जाईल आणि तुमची सुटका होईल.

गव्हाच्या पाती, तुळस आणि लिंबू

कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय किडनी स्टोनपासू मुक्ती हवी असेल तर लिंबासोबत, गव्हाच्या पाती आणि तुळस यांचे मिश्रण प्या. यासाठी १ चमचा लिंबू, १ चमचा तुळशीचा रस आणि १ ग्लास गव्हाचा रस एकत्र मिसळा. हे मिश्रण दिवसातून २ ते ३ वेळा प्या. यामुळे किडनी स्टोनची समस्या दूर होईल. (Kidney Stones)