हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही जर चिकन खात असला तर तुमच्यासाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून बर्ड फ्लू या संसर्गजन्य रोगाने धुमाकूळ घातला आहे. अन आता या रोगाच्या संख्येत वाढ होत निघाली आहे. त्यामुळे अनेक लोकांच टेन्शन वाढलंय , या विषाणूच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठीच सरकारने तातडीचे उपाय जाहीर केलेत. तसेच या उपाय योजनेसाठीच केंद्र सरकारने पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाच्या माध्यमातून 9 राज्यांसाठी बर्ड फ्लूविरुद्ध अलर्ट जारी केला आहे. यासोबतच वेगवेगळ्या योजनांची आखणी केली आहे. तर चला यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना अन 9 राज्यांना अलर्ट , याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.
पंजाबसहित 9 राज्यांना अलर्ट जारी –
वाढत्या बर्ड फ्लूमुळे सरकारने देशभरात पंजाबसहित 9 राज्यांना अलर्ट जारी केला असून, पोल्ट्री फार्मसाठी अत्यंत कठोर जैवसुरक्षा उपायांची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. याच बरोबर या योजनेत जलद प्रतिसाद पथकांची सक्रिय करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे कि , ‘आता वेळ आहे तातडीने उपाययोजना करण्याची, अन्यथा या विषाणूचा प्रसार रोखता येणार नाही’.
कर्मचाऱ्यांसाठी जागरूकता कार्यक्रम –
बर्ड फ्लू हा संक्रमित पक्ष्यांचा संपर्क, दूषित वातावरण आणि नीट न शिजवलेले चिकन यामुळे होऊ शकतो. याचसोबत H5N1 विषाणू संक्रमित पक्ष्यांना हाताळताना किंवा पोल्ट्री फार्ममध्ये काम करत असताना देखील होण्याची शक्यता आहे. यासाठीच पोल्ट्री फार्मसाठी जैवसुरक्षा लेखापरीक्षण, कर्मचाऱ्यांसाठी जागरूकता कार्यक्रम, आणि असामान्य मृत्यूंचे वेळेवर अहवाल देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. जलद प्रतिसाद पथकांची स्थापना आणि पशुवैद्यकीय व प्रयोगशाळांच्या संसाधनांचा विस्तार यावरही भर देण्यात आला आहे.
फ्लूची प्रमुख लक्षणे अन उपाय –
बर्ड फ्लूची प्रमुख लक्षणे आहेत, ज्यामध्ये मानवाला ताप येणे , खोकला, डोळे लाल होणे , नाकातून रक्त येणे , मळमळणे अशा अनेक समस्या येऊ शकतात. यासाठी सरकारने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच चिकन अन अंडी पूर्णपणे शिजवूनच खावीत असा सल्लाही दिला आहे. यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घ्यायची आहे. बाहेरून आल्यास हात धुणे , इन्फ्लूएन्झाच्या प्राण्यांशी संपर्क टाळणे , वेळोवेळी डॉक्टरचा सल्ला घेणे अन सर्वात महत्वाचे गंभीर आजाराचा धोका कमी करण्यासाठी फ्लूची लस घेणे. पोल्ट्री फार्ममधून ते आपल्या घरापर्यंत पोहचू नये म्हणून केंद्र सरकारने राष्ट्रभरात तत्परतेने आणि सर्वसमावेशक पावले उचलली आहेत.