बांधकाम कामगारांची दिवाळी होणार आणखी गोड; सरकारने प्रतिदिन वाढवले ‘एवढे’ वेतन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपले सरकार हे देशातील सर्व सामान्य जनतेचा नेहमीच विचार करत असतात. आणि त्या जनतेचा विचार करून त्यांच्या हिताचे निर्णय घेत असतात. अशातच आता मोदी सरकारने देशातील कामगारांची दिवाळी आणखीन आनंदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारने कामगारांसाठी महागाई भत्ता म्हणजेच VDA मध्ये सुधारणा केली आहे. आणि त्यांना देण्यात येणारे वेतन हे प्रतिदिन 1035 रुपये करण्याची घोषणा देखील केली आहे. आता या घोषणेनंतर कामगारांना नक्की किती पैसे मिळतील याची माहिती आपण जाणून घेऊया.

नुकतेच 26 सप्टेंबर म्हणजेच गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक बैठक झाली. आणि या बैठकीत मोठी घोषणा करण्यात आली. अनेक कामगारांच्या वेतनामध्ये लक्षणीय वाढ देखील करण्यात आलेली आहे. यावेळी या निर्णयाची माहिती देताना कामगार मंत्रालयाने सांगितले की कामगारांच्या राहणीमानातवाढ करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. त्याचप्रमाणे बांधकाम खाणकाम आणि कृषी यांसारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना 1 ऑक्टोबर पासून त्यांची वेतन वाढ मिळणार आहे. सुधारित नियमानुसार आता पुढील महिन्याच्या एक तारखेपासून म्हणजेच 1 ऑक्टोबर पासून हे नियम लागू होतील.

वाढत्या महागाईच्या काळात कामगारांसाठी हा एक मोठा दिलासा असणार आहे. औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक 2.40 अंकांनी वाढलेला आहे. तसेच बांधकाम क्षेत्रात काम करणारे अंकुशल कामगारांसाठी किमान वेतन हे 783 रुपये प्रति दिन आणि 20358 रुपये प्रति महिना एवढे झालेले आहे. तसेच अर्धकुशल कामगारांसाठी हे वेतन 68 रुपये प्रति दिन म्हणजेच 22568 रुपये प्रति महिना जर कुशल आणि काम गार कोणी कामगारांसाठी हे वेतन प्रति दिन 954 रुपये म्हणजेच महिन्याचे 24804 एवढे असेल.

सरकारने घेतलेला या निर्णयामुळे कामगारांच्या वेतनात वाढ होणार आहे. यामुळे त्यांचे जीवनमान देखील उंचावणार आहे. त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधांचा लाभ देखील मिळणार आहे. या आठवड्यातच हजारो कामगारांनी देशभरात निषेध केला होता. तसेच त्यांच्या वेतनात वाढ व्हावी आणि चार कामगार कायदे रद्द करण्याची मागणी देखील केली होती. आता याच पार्श्वभूमीवर सरकारने हे मोठे निर्णय घेतलेले आहेत.