सरकाराच्या ‘या’ निर्णयामुळं वाहनांच्या किंमती कमी होण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसमुळे भारतीय ऑटो इंडस्ट्रीला मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊन काळात वाहनांच्या विक्रीत मोठी घट झाल्याच पाहायला मिळालं. याशिवाय अनेक समस्या ऑटो इंडस्ट्रीसमोर उद्भवल्या आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी, ऑटो सेक्टरमध्ये तेजी आणण्यासाठी सरकारकडून पाऊलं उचलली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी किंमतीत वाहन खरेदी करता येईल.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय उद्योग मंत्रालयाने एक प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावानुसार GST, Cess आणि Road Tax मध्ये घट केल्यास वाहन उद्योगाला फायदा मिळू शकेल. वाहनावरील टॅक्स कमी केल्याने वाहनांची किंमत कमी होईल. याचा फायदा वाहन उद्योग आणि ग्राहक दोघांना होऊन वाहन विक्रीला चालना मिळेल. त्याशिवाय संपूर्ण देशात Road Tax एकसमान ठेवण्याविषयीही चर्चा सुरु आहे.

सध्या, देशातील प्रत्येक राज्यात वेगवेगळा Road Tax असल्याने वाहनांच्या ऑन रोड किंमतीत मोठा फरक पडतो. याशिवाय सरकार लवकरच Vehicle Scrappage Policy बाबतही घोषणा करु शकते. हे धोरण जाहीर झाल्यास देशांतर्गत वाहन उद्योगाला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. शिवाय या उद्योगाची वाहन क्षमता वाढवण्याचाही सरकारचा मानस आहे.

या व्यतिरिक्त विविध देशांशी मुक्त व्यापार करारावर Free Trade Agreement स्वाक्षरी करण्याबाबतही सरकार विचार करत आहे, जेणेकरुन निर्यातीत-एक्सपोर्टमध्ये वाढ होऊ शकेल. या सर्व बाबींवर, सरकार एकत्र निर्णय घेणार नसून वेगवेगळ्या वेळी घोषणा करणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment