जावली | सातारा जिल्ह्यातील अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील वाई, पाटण, महाबळेश्वर तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे तीन तालुक्यामध्ये भूस्खलनाने मोठी जीवित व आर्थिक नुकसान केले आहे. सातारा जिल्ह्यावरील आसमांनी संकटात राज्याच्या महाविकास आघाडी सरकार कडून दुर्गम जावलीच्या मदतीला कटीबद्ध असल्याची ग्वाही सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जावली येथील रेगडी येथे भेटी दरम्यान पत्रकारांशी बोलताना दिला.
यावेळी रेंगडी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, सभापती जयश्री गिरी, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, विजयराव मोकाशी, कांताराम कासुर्डे, शिवराम सपकाळ, रविकांत सपकाळ, आतिष कदम, संकेत पाटील यांची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, रेंगडी येथील चार जण पुराच्या पाण्यात वाहून गेले ही दुर्दैवी घटना आहे. आपतिग्रस्तांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे राहणार आहे. सातारा जिल्ह्यातील नुकसानीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितली असून जिल्ह्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करू. वाहून गेलेल्या शेतीची दुरुस्ती करू,अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आधार देऊ.