भारत दरवर्षी 20 हजार कामगार इटलीला पाठवणार; मंत्रालयाकडून महत्त्वपूर्ण कराराला मान्यता

itali ,bharat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आता भारतीय कामगारांसाठी अत्यंत महत्वाची संधी उपलब्ध होणार आहे. नुकतीच इटली आणि भारताने एका स्थलांतर आणि गतिशील करारावर स्वाक्षरी केली आहे. हा करार विद्यार्थी आणि कामगारांना पाठिंबा देण्यासाठी, व्यावसायिक लोकांची तरुणांची गतीशीलता सुधारण्यासाठी करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे, या करारामुळे सरकार 20 हजार भारतीय कामगार इटलीला पाठवणार आहे. ज्याला मंत्रालयाने परवानगी दिली आहे.

भारत आणि इटलीमध्ये झालेल्या एका करारामुळे भारतीय विद्यार्थ्यांसाठी इटलीमध्ये जाऊन संधी, व्यवसायिक, प्रशिक्षण घेण्याची दारे उघडी झाली आहे. मुख्य म्हणजे कामगारांची कमतरता भरून काढण्यासाठी तसेच दोन्ही देशातील लोकांमधील संपर्क वाढवण्यासाठी इटली सरकारने भारत सोबत हा करार केला आहे. या कराराचा फायदा इटलीबरोबर भारताला देखील तितकाच होणार आहे. विशेष बाब म्हणजे, इडली जाणाऱ्या कामगारांसाठी राखीव कोटाही निश्चित करण्यात आला आहे. ज्यामुळे बिगर हंगामी आणि हंगामी कामगारांना इडली तील विविध क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध होईल.

दरम्यान, या करारानुसार हंगाम आणि बिगर हंगामासाठी भारतीय कामगारांचा एक विशिष्ट कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार, बिगर हंगामी कामगारांसाठी इटली सरकारने 2023 साठी 5 हजार, 2024 साठी 6 हजार आणि 2025 साठी 7 हजारांचा कोटा राखीव ठेवला आहे. इटलीने बिगर हंगामी सर्व हंगामी कामगारांसाठी एकूण 12 हजार कोटा निश्चित केला आहे. त्याचबरोबर हगामी कामगारांसाठी एकूण कोटा 8000 निश्चित केला आहे. थोडक्यात, या कराराच्या माध्यमातून भारत सरकारने दरवर्षी 20 हजारहून अधिक कामगार इडलीत पाठवण्यास मंजूरी दिली आहे.