कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळून जीवितहानीही झाली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कोयनानगरला येऊन दुर्घटनाग्रस्थांची भेट घेतली जाणार होती. मात्र, खराब हवामानामुळे त्यांना परत मुंबईला परतावे लागले. यानंतर पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी कोयनानगर येथे पत्रकार परिषद घेतली. या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांचे लवकरात लवकर पुनर्वसन करता येईल यासाठी शासन सकारात्मक आहे, असे गृहराज्यमंत्री देसाई यांनी सांगितले.
कोयनानगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेनंतर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते नुकसानग्रस्तांना मदतीचे धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी मंत्री देसाई म्हणाले कि, या ठिकाणी राहणाऱ्या लोकांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/337494217855826/
या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे पुनर्वसन करणे हि सरकारची जबाबदारी आहे. ती योग्य रीतीने सुस्थितीत लोकांचे पुनर्वसन करता येईल यासाठी प्रयत्न केले जातील तत्पूर्वी येथील नुकसानग्रस्तांचे तात्पुरत्या स्वरूपात कॉलनीतील घरे दुरुस्त करून त्यांची त्या ठिकाणी सोया करता येईल, यासाठी शासन प्रयत्नशील राहील, असे मंत्री देसाई यांनी सांगितले.
बाळासाहेब पाटील म्हणाले की, अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात दुर्गम अशा ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा लोकांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील. सरकार या नुकसानग्रस्तांच्या पाठीशी उभे आहे.