हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Government Schemes For Women) आपलं सरकार कायम महिलांना सक्षम बनवण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. ज्यांच्या माध्यमातून महिलांच्या आपल्या पायावर उभे राहता येईल आणि भविष्यात आर्थिक अडचणींचा सामना करणे सोपे जाईल. कोणत्याही महिलेला कुणावरही अवलंबून रहायला लागू नये यासाठी सरकारच्या अनेक योजना आज फायदेशीर ठरत आहेत. ज्यांच्या माध्यमातून देशातील कित्येक महिला आज आत्मनिर्भर झाल्या आहेत. आज आपण अशाच एका योजनेची माहिती घेणार आहोत जिच्या माध्यमातून सरकार महिलांना ५ लाख रुपयांपर्यंतचे फायदे प्रदान करत आहे.
मोदी सरकारची महिलांसाठी खास योजना (Government Schemes For Women)
महिलांना आत्मनिर्भर व्हावं, स्वतः काहीतरी करून दाखवावा यासाठी मोदी सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत. ज्यामध्ये फेब्रुवारीपासून आणखी एका योजनेचा समावेश करण्यात आला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात ‘लखपती दीदी’ या योजनेचा उल्लेख केल्याचे आपण अनेकदा ऐकले असेल. (Government Schemes For Women) ज्यावर १ फेब्रुवारी २०२४ रोजी अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी चर्चा केली होती. ही एक अशी योजना आहे जी देशातील महिलांना १ लाख ते ५ लाख रुपयांपर्यंतचे विविध फायदे प्रदान करते आहे.
‘लखपती दीदी’
मोदी सरकारची ‘लखपती दीदी’ ही योजना महिलांचा आर्थिक विकास करण्यासाठी फायदेशीर ठरते आहे. कारण या योजनेअंतर्गत महिलांना व्याजाशिवाय कर्ज दिले जाते. (Government Schemes For Women) ज्यामुळे स्वयंरोजगारासाठी महिलांना ही योजना लाभदायी ठरताना दिसते आहे. सरकारच्या ‘लखपती दीदी’ या योजनेंतर्गत महिलांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. ज्यातून महिलांना रोजगारासाठी पात्र केले जाते. यामुळे महिला स्वतःहून एखादा व्यवसाय करू शकतात आणि आपल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करू शकतात. इतकेच नव्हे तर यासोबत आपल्या कौशल्यातून स्वत:ला आर्थिकदृष्ट्या मजबूतदेखील बनवू शकतील.
१ कोटी महिलांना यश संपादन
भारत सरकारने ‘लखपती दीदी’ ही योजना १५ ऑगस्ट २०२३ रोजी सुरू केली. तेव्हापासून आतापर्यंत देशातील सुमारे १ कोटी महिलांनी खास यश संपादन केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी १८ ते ५० वयोगटातील कोणत्याही महिला अर्ज करू शकतात आणि स्वयंरोजगारासाठी सक्षम होऊ शकतात. जसे १ कोटी महिलांनी विशेष यश संपादन केले आहे तसेच देशातील आणखी महिलांनी यश संपादन करून आत्मनिर्भर व्हावे, यासाठी ही योजना कार्यरत आहे. (Government Schemes For Women)