ई-स्कूटरमधील आगीच्या घटनांबाबत सरकारची कडक भूमिका, कंपन्यांविरोधात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | केंद्राने अलीकडेच देशभरात ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) आगीच्या घटनांच्या फॉरेन्सिक तपासणीचे आदेश दिले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की,” सरकारने या घटना गांभीर्याने घेतल्या असून चौकशी अहवालात दोष आढळल्यास इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादकांवर कारवाई केली जाईल.”

गेल्या आठवडाभरात इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या चार घटना घडल्या आहेत. यामध्ये ओला इलेक्ट्रिकच्या S1 Pro चाही समावेश आहे. ओला इलेक्ट्रिकने या घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी स्वतंत्र तपासाची घोषणा केली आहे. मात्र, इतर ईव्ही दुचाकी उत्पादकांकडून आगीच्या घटनांनंतर त्यांच्या कारवाईबाबत कोणतेही अधिकृत स्टेटमेंट आलेले नाही.

तज्ञ तपास करतील
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणाले, “गेल्या एका आठवड्यात दुचाकींना आग लागण्याच्या एकूण चार घटना घडल्या आहेत आणि ही अतिशय गंभीर समस्या आहे. आम्ही प्रत्येक घटनेची फॉरेन्सिक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. या तपास पथकात सेंटर फॉर फायर एक्सप्लोझिव्ह, डीआरडीओ आणि आयआयएससी, बंगळुरू येथील तज्ज्ञांचा समावेश असेल.”

कंपन्यांवर कारवाई केली जाईल
भारतात इलेक्ट्रिक वाहने आणि स्वच्छ इंधन वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी गडकरी खूप प्रयत्न करत आहेत. ते म्हणाले की,” भारतात ईव्ही आणि बॅटरीचे उत्पादन जागतिक स्टॅंडर्डनुसार केले जात आहे. तज्ज्ञ समितीच्या अहवालाची आम्ही वाट पाहत आहोत. अहवाल आल्यानंतर कमतरता आढळून आल्यास उत्पादकावर योग्य ती कारवाई केली जाईल.”

वाढलेले तापमान हे कारण असू शकते
मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार आगीच्या घटनांमागे वाढलेले तापमान हे कारण असू शकते. गडकरी म्हणाले, “आम्ही अजूनही तज्ज्ञ समितीच्या अहवालाची वाट पाहत आहोत. तज्ज्ञ समितीचा अहवाल आल्यानंतरच योग्य ती कारवाई करू. लोकांच्या सुरक्षेसाठीही आम्ही पुरेशा उपाययोजना करू.”

यामुळे बॅटरी पेट घेते
सध्या भारतात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर बहुतेक लिथियम-आयन बॅटरीसह येतात. उत्पादनाअभावी किंवा त्यांचा योग्य वापर न केल्यामुळे या बॅटऱ्यांना आग लागू शकते. शिवाय, बॅटरी चालवणारे सॉफ्टवेअर योग्यरित्या डिझाइन केलेले नसले तरीही आग लागू शकते.

Leave a Comment