कराड | महाबळेश्वरच्या शासकीय मधुबन येथील मध म्हणजे जगात भारी आहे. मधुबन मध आता एका मराठी माणसाच्या सहकार्याने राज्यभर मिळणार आहे. कराडमध्ये शासनाच्या मधुबनच्या मधाचा गोडवा गंगा मेडिसीन शाॅपीच्या माध्यमातून लोकांना मिळणार असल्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सांगितले.
कराड येथील बसस्थानक परिसरात गंगा मेडिसन शाॅपीचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योगचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप, जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बंसल, जिल्हा परिषद सदस्य व रयत कारखाना चेअरमन अँड. उदयसिंह पाटील, सातारा जिल्हा परिषद सदस्य प्रदिप पाटील, के. एन. गुजर चँरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष डॉ. अशोक गुजर, सातारा जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सागर पाटील,महाबळेश्वर मध संचालनालय चे संचालक डी आर पाटील, जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी निसार तांबोळी,दिलीप सांळुखे, गंगा मेडिसन शाॅपीच्या प्रमुख मीना चव्हाण, स्वातंत्र्य सैनिक रघुनाथ चव्हाण ट्रस्टचे अध्यक्ष अरविंद चव्हाण व उत्तर तांबवे माजी सरपंच शशिकांत चव्हाण आदी उपस्थितीत होते.
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यातील निसर्ग संपन्नता आहे. या दऱ्या खोऱ्यात अनेक वनआैषधी आहेत. जगात भारी म्हणजे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरचा मधुबन मध आहे. वैद्यकीय उपचारासाठी अनेकजण मधुबनचा मध घेत असतात. यापूर्वी मधुबन मध उपलब्ध होत नव्हता. आता मराठी माणूस असलेल्या अरविंद चव्हाण यांच्या गंगा शाॅपीच्या माध्यमातून हा मध राज्यभर लोकांना मिळेल. राज्यातून जगाभरात मधुबन लोकांना मिळावा, अशी व्यवस्था आता करावी. यावेळी बिपिन जगताप व अजय कुमार बनसल,अँड उदयसिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत अरविंद चव्हाण यांनी सुत्रसंचालन अॅड. विजयसिंह पाटील यांनी केले. आभार शशिकांत चव्हाण यांनी मानले.