अमरावती प्रतिनिधी । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आज दि. 20 डिसेंबर 2019 रोजी अमरावती येथे उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ, क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ आणि स्त्री शक्ती पुरस्काराचे वितरण आदी कार्यक्रम होणार आहेत.
कोश्यारी हे दि. 20 डिसेंबर, 2019 रोजी सकाळी 8.20 वाजता रामगिरी नागपूर येथून हेलीकॉप्टरने अमरावतीकडे प्रयाण होतील. सकाळी 9.05 वाजता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ हेलिपॅड येथे त्यांचं आगमन होणार आहे. सकाळी 9.10 वाजता हेलीपॅडवरून श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाकडे अमरावती येथून वाहनाने जाणार आहेत. सकाळी 9.20 वाजता ते हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे जाणार आहेत. सकाळी 9.30 ते सकाळी 10.50 दरम्यान राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा कार्यक्रमास उपस्थिती दर्शवणार आहेत.
नंतर 10.25 वाजता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसर येथे त्यांच आगमन होईल. सकाळी 10.25 ते सकाळी 10.40 वाजता वसतिगृहाच्या इमारतीचे उद्घाटन व संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याला माल्यार्पण, सकाळी 11 ते दुपारी 12.40 वाजता विद्यापीठात दिक्षांत समारंभास उपस्थिती, दुपारी 12.40 ते 1.25 वाजता विद्यापीठ अतिथीगृह येथे भोजन करणार आहेत. दुपारी 1.30 ते 2.30 वाजता संत गाडगेाबा अमरावती विद्यापीठ परिसरातील उन्नत भारत अभियानाच्या विभागीय समन्वय केंद्राचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित लावणार आहेत. दुपारी 2.30 वाजता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथून वाहनाने प्रयाण करतील.
तसेच दुपारी 2.40 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे जातील व दुपारी 3 ते सायं. 4 वाजता राजमाता अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार कार्यक्रमास उपस्थिती राहणार आहेत. सायं. 4 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथून प्रयाण करतील. सायं. 4.10 वाजता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथील हेलिपॅडवर आगमन आणि सायं. 4.15 वाजता हेलीकॉप्टरने नागपूरकडे प्रयाण होतील. असा त्यांचा दिवसभराचा प्रवास असणार असणार आहे.