नवी दिल्ली । देशात FASTag अनिवार्य झाल्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर, 18 मार्च रोजी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत घोषणा केली की,’भारतातील सर्व टोल बूथ एका वर्षाच्या आत काढून टाकले जातील आणि त्याऐवजी ते पूर्णपणे न्यू GPS बेस्ड टोल कलेक्शन मध्ये बदलले जाईल. दुसरीकडे बहुजन समाज पक्षाचे (BSP) खासदार दानिश अली यांनी सभागृहात विचारले की, ‘देशात राष्ट्रीय महामार्गाच्या प्रत्येक 60 कि.मी.वर टोल आहे पण माझ्या मतदारसंघात 40 कि.मी. वर टोल बूथ आहेत’.
त्याला उत्तर देताना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी म्हणाले की, “आम्हाला माहिती आहे की, ही विसंगती देशातील अनेक भागात आहे, जे चुकीचे आहे आणि मला खात्री करुन घ्यायची आहे की, आम्ही एका वर्षात सर्व टोल बूथ काढून टाकू म्हणजेच आता ऑनलाइन इमेजिंगच्या मदतीने जीपीएस द्वारे टोल घेतला जाईल.”
सर्व टोल बूथ पूर्णपणे बंद होतील
कित्येक वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर सरकारने FAStag जारी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि तो अनिवार्य देखील करण्यात आला. खरं तर, सध्या अस्तित्त्वात असलेल्या वाहनांपैकी 93 टक्के वाहने FAStag वापरुन टोल भरतात. जे FAStag योजनेच्या यशाचे संकेत देते, परंतु इतकी यशस्वी टोल योजना असूनही, त्याऐवजी वर्षाच्या आत बदलण्याची चर्चा का होत आहे?
GPS बेस्ड टोल कसे काम करेल?
जर GPS बेस्ड टोल सिस्टीम लागू केली गेली तर ते प्रत्येक वाहनास जीपीएस वाहन ट्रॅकिंग डिव्हाइस किंवा ट्रान्सपॉन्डर बसवितात. जीपीएस इमेजिंगच्या मदतीने, आपला टोल तुमच्या प्रवासाच्या आधारे वजा केला जाईल. तसेच, GPS टोल कलेक्शन करण्यासाठी जीपीएस ट्रॅकिंगचा वापर करून, आपल्या प्रवासाची सर्व माहिती ट्रॅक करू शकता.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group