नांदगावमध्ये ग्रामपंचायत सदस्याकडून आईच्या स्मरणार्थ स्वखर्चाने औषध फवारणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील नांदगाव येथे बाधितांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत ‘माझे गाव माझी जबाबदारी’ म्हणत येथील ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे यांनी मातोश्री कै. सौ. सिंधुताई विश्वनाथ सुकरे यांच्या स्मरणार्थ गावात सोडियम हायपो क्लोराइड औषधाची स्वखर्चातून फवारणी केली. त्यांच्या या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांच्यातून समाधान व्यक्त केले जात आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या वाढत चालली आहे. तर त्यामुळे काहींचे निधनही झाले आहे. या साऱ्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संक्रमण थोपविण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे यांनी गावात निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध फवारणीचा रविवारी उपक्रम राबवला. उपक्रमाची सुरुवात ग्रामदैवत रघुनाथ महाराज मंदिर व परिसरात औषध फवारणी करुन झाली.माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती पाटील, वसंत माटेकर यांच्या हस्ते फवारणी करण्यात आली.

यावेळी रयत सहकारी साखर कारखान्याचे संचालक जगन्नाथ माळी, बाजार समितीचे माजी संचालक सतीश कडोले, विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष जगन्नाथ पाटील, भगवानराव पाटील, विलास पाटील, सोनाप्पा पाटील, गौरीहर तांबेकर, शिवाजी माळी, मारुती जंगम, दीपक मुळीक, रघुनाथ मोहिते आदींची उपस्थिती होती. औषध फवारणीचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संजय तलबार, रघुनाथ जाधव, शशिकांत माळी,पोपट आवळे, अमर कदम, रोहित मुळीक, गणेश पाटील ,अनिकेत तांबेकर आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Comment