कराड | ग्रामपंचायतीमध्ये विकासकामे होण्यासाठी ग्रामसेवक व सरपंच ही गावचा गाढा चालविणारी महत्वाची दोन चाके आहेत. या गावपातळीवर गावासाठी हिताची कामे करताना सरपंच, ग्रामसेवक यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अशावेळी ग्रामसेवकांना विशेष संरक्षण देण्यासाठी सरपंच परिषदेने कायदा करावा व त्यांचा पाठपुरावा करावा, अशी मागणी कराड पंचायत समितीचे उपसभापती रमेश देशमुख यांनी केली.
कराड तालुक्यातील आदर्श ग्राम, आदर्श ग्रामसेवक, आदर्श कर्मचारी, विविध क्षेत्रातील नामांकित पुरस्कार प्राप्त गुणवंत व्यक्तींचा सत्कार समारंभ सरपंच परिषद यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. कराड पंचायत समितीच्या सभागृहात ते बोलत होते. यावेळी सभापती प्रणव ताटे, सरपंच परिषद पुणेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र जाधव, उपाध्यक्ष पै. सतिश इंगवले, फत्तेसिंह जाधव, नरेंद्र पाटील, रेश्मा यादव, प्रताप चव्हाण, सुचिता मोहिते, जावेद मुल्ला, ग्रामसेवक प्रमोद ठोके यांच्यासह कराड तालुका सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सरपंच परिषदेने आयोजित कार्यक्रमातील सत्कारमूर्ती सन्मानित
सरपंच परिषदचे मार्गदर्शक शंकरराव खापे (हॉनररी डॉक्टरेट पदवी प्राप्त), डॉ. सतिश शिवाजी सोनवणे (डॉक्टर ऑफ एज्युकेशन पदवी प्राप्त), ग्रामपंचायत बनवडी
(आदर्श जिल्हा ग्राम पुरस्कार-2017-18), ग्रामपंचायत गमेवाडी (आदर्श तालुका ग्राम पुरस्कार-2019-20), वसंत नामदेव मुळे (गुणवंत कर्मचारी पुरस्कार विस्तार अधिकारी पं. स. कराड- 2018-19), चंद्रकांत हणमंत दाभाडे (आदर्श ग्रामसेवक कराड तालुका पुरस्कार-2017-18), श्रीमती. गीता कोळी (आदर्श ग्रामसेवक कराड तालुका पुरस्कार-2018-19), प्रभाकर केंगार (आदर्श ग्रामसेवक कराड तालुका पुरस्कार-2019-20), सचिन लालासो जाधव (महात्मा फुले राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त ग्रा.पं.कर्मचारी-2020-21)