हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फक्त शारीरिक हालचाल,हातवारे आणि चेहऱ्यावरील हावभावांच्या जोरावर संपूर्ण जगातील लोकांचे हृदय जिंकणाऱ्या चार्ली चॅप्लिन या महान विनोदवीराची आज १३१वी जयंती आहे.चार्ली चॅप्लिनच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या बाबतीतला एक किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
शब्दांशिवायही चित्रपट किती उत्कृष्ट आणि प्रभावीशाली बनू शकतो याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे चार्ली चॅप्लिन.‘द ग्रेट डिक्टेटर’ या आपल्या चित्रपटातून अडोल्फ हिटलर सारख्या हुकुमशाहालाही थेट आव्हान देणाऱ्या चार्लींचे आयुष्य हे चित्रपटांप्रमाणेच रंजक होत.अगदी त्याच्या मृत्यृनंतरही या रंजकतेने त्यांची पाठ सोडली नाही.चार्लीचे वयाच्या ८८ व्या वर्षी १९७७ साली निधन झाले होते. त्यानंतर गजी काही दिवसांतच त्यांचा मृतदेह हा चोरीला गेलेला होता.ही जगाला आवाक् करणारी घटना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.काही चोरट्यांनी फक्त पैसे मिळवण्यासाठी त्यांचा मृतदेह चोरला होता.मात्र तब्बल ११ महिन्यानंतर अथक प्रयत्नातून त्या चोरांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं.आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चोरांनी ११ महिेने चार्लीच्या मृतदेहाला सांभाळून ठेवले होते.
सध्या चार्ली चॅप्लिन यांच्या जीवनावर एक चित्रपट तयार केला जात आहे.‘चार्ली चॅप्लिन: अ मॅन ऑफ द वर्ल्ड’ असे या चित्रपटाचे नाव आहे. हा एक डॉक्युमेंट्री स्टाईलचा चित्रपट आहे. यामध्ये त्यांचे पडद्यामागचे काही फोटोज् आणि व्हिडीओज् दाखवले जातील.या डॉक्युमेंट्रीमध्ये त्यांच्या मृतदेह चोरीचा हा किस्सा देखील दाखवला जाणार आहे.या चित्रपटाची निर्मिती चार्लीची नात कार्मन चॅप्लिन करणार आहे.
असं म्हटलं जातं होतं की चार्ली चॅप्लिन हे कट्टर कम्यूनिस्ट विचारांचे होते.त्यामुळे ७०च्या दशकात त्यांच्या चित्रपटांवर अमेरिकेत बंदी घातली गेली होती. परंतु तरीही आपल्या अफाट लोकप्रियतेच्या बळावर १९७३ साली त्यांनी ऑस्कर पुरस्कारावर आपले नाव कोरले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.