Gray Hair | आज-काल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरावर या गोष्टीचा परिणाम होत असतो. त्वचेशी संबंधित त्याचप्रमाणे केसांची संबंधित अनेक समस्या या लोकांना कमी वयात चालू होतात. तसेच आजकाल पांढऱ्या केसांची समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. काही लोकांचे केस हे वयोमानानुसार पांढरे होतात, तर काहींचे केस अकाली पांढरे होतात. केसांवर अनेक लोक ब्युटी ट्रीटमेंट्स, केलिकल्स त्याचप्रमाणे प्रॉडक्ट वापरल्याने देखील केस पांढरे होत आहेत.
अकाली काळे झालेले हे पांढरे केस (Gray Hair) लपवण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयत्न देखील करत असतात. हे पांढरे केस लपवण्यासाठी लोक केसांना मेहंदी, डाय, हेअर कलर लावतात. परंतु ही समस्या दूर होण्याऐवजी केसासंबंधित समस्या आणखीनच वाढायला लागतात.
केसांना मेहंदी, डाय किंवा हेअर कलर लावल्याने केस काळे होतात. परंतु काही दिवसांनी ते पुन्हा जास्त प्रमाणात पांढरे दिसू लागतात. या आर्टिफिशियल पर्यायांपेक्षा केसांसाठी जर तुम्ही नैसर्गिक घटकांचा वापर करून काळजी घेतली, तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. केसांना मेहंदी लावणे हा पूर्वीपासूनचा एक नैसर्गिक उपाय मानला जातो. परंतु यासोबतच तुम्ही त्यात आणखी काही नैसर्गिक घटक टाकून एक चांगला हेअरमास तयार करू शकता. ज्यामुळे तुमच्या केसांना फायदा होईल आता हेअर मास्क कसा तयार करायचा हे आपण जाणून घेणार आहोत
साहित्य | Gray Hair
- कॉफी पावडर – 2 टेबलस्पून
- मेहेंदी पावडर – 2 टेबलस्पून
- ग्रीन टी – 1 टेबलस्पून
- दही – 2 टेबलस्पून
- पाणी – गरजेनुसार
कृती
- सगळ्यात आधी एका भांड्यात कॉफी पावडर मेहंदी पावडर ग्रीन टी घेऊन त्यात गरजेनुसार पाणी घालून त्या मिश्रणाची एक पेस्ट तयार करून घ्या.
- त्यानंतर तयार केलेले हे मिश्रण गॅसवर मंद आचेवर गरम करायला ठेवा.
- या मिश्रणातील संपूर्ण पाणी सुकून जाईपर्यंत हे मिश्रण गॅसवर मंद आचेवर ठेवा.
- या मिश्रणातील संपूर्ण पाणी सुकून गेल्यावर त्यात थोडे दही घाला.
- दही घातल्यानंतर हे मिश्रण थोडेसे शिजवून घ्या.
- जेव्हा या मिश्रणाला दात काळा रंग येईल आणि हे मिश्रण पातळ पेस्टसारखे दिसू लागेल तेव्हा गॅस बंद करा.
- त्यानंतर हे मिश्रण एका वेगळ्या भांड्यात काढून घ्या.
हेअर मास्क केसांना लावण्याची पद्धत :
ज्याप्रमाणे आपण केसांना डाय किंवा मेहंदी लावतो त्याचप्रमाणे हा हेअर मास्क केसाच्या ब्रशच्या मदतीने लावावा.
हा हेअरमास्क लावल्यानंतर किमान 15 ते 20 मिनिट तो तसाच केसांवर राहू द्या.
त्यानंतर थोड्यावेळाने केस नॉर्मल पाण्याने धुवा आणि केस धुताना कोणत्याही प्रकारचा शाम्पू किंवा साबण चा वापर करू नका.