हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता मागील वर्षभरापासून अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात उतरवल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ग्रीव्हज इलेक्ट्रिक मोबिलिटीने आपली नवीन ई-स्कूटर अँपिअर प्राइमस लॉन्च केली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर हायस्पीड असल्याचा दावा कंपनीने केला आहे. चला आज आपण जाणून घेऊयात या स्कुटरची खास वैशिष्ट्ये आणि तिच्या किमतीबाबत….
बॅटरी पॅक आणि रेंज –
Ampere Primus मध्ये स्मार्ट BMS सह 3 kWh LFP बॅटरी पॅक देण्यात आला आहे. हि बॅटरी फुल्ल चार्ज होण्यासाठी 5 तास लागतात. तसेच या स्कूटरमध्ये 4 kW PMS मोटर वापरण्यात आली आहे. या स्कुटरमध्ये पॉवर, सिटी आणि इको या तीन रायडिंग मोडसह रिव्हर्स मोड देखील मिळतो. कंपनीचा दावा आहे कि एकदा पूर्ण चार्जिंग केल्यांनतर ही इलेक्ट्रिक स्कुटर पॉवर मोड मध्ये १०० किमीपर्यंत रेंज देईल. तसेच या स्कूटरचा टॉप स्पीड 77 किमी प्रतितास आहे. याशिवाय ही हायस्पीड इलेक्ट्रिक स्कुटर अवघ्या 4.2 सेकंदात 0-40 किमी प्रतितास वेग घेऊ शकते.
अन्य फीचर्स –
गाडीच्या अन्य फीचर्स बाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये अँप कनेक्टिव्हिटी, ब्लूटूथ, नेव्हिगेशन तसेच वन टच रिव्हर्स मोड यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. स्कूटरला टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क, रिअर स्प्रिंग फोर्क, ड्रम ब्रेक्स, एप्रॉन माउंटेड टर्न इंडिकेटर, स्टेप अप सीट आणि सिंगल पीस ग्रॅब्रेल देखील मिळतात.
किंमत किती?
Ampere Primus ची एक्स-शोरूम किंमत 109900 रुपये ठेवण्यात आली आहे. हि इलेक्ट्रिक स्कुटर हिमालयन व्हाइट, हॅवलॉक ब्लू, बक ब्लॅक आणि रॉयल ऑरेंज या चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या स्कुटरचा थेट सामना ओला, एथर आणि बजाजच्या गाड्यांशी होणार आहे.