Grid Of Expressways in Maharashtra : महाराष्ट्रात आता तीन मोठे द्रुतगती महामार्ग एकमेकांना जोडले जाणार आहेत, ज्यामुळे राज्यभर एक गतीशील महामार्ग ग्रीड तयार होणार आहे. यामध्ये मुंबई-गोवा महामार्ग, नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग यांचा समावेश आहे.
‘ग्रीड एक्सप्रेसवे’ महाराष्ट्रात कसा असेल? (Grid Of Expressways in Maharashtra)
नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा कोकण द्रुतगती महामार्ग यांना समृद्धी महामार्गाशी जोडले जाणार आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र एका एक्सप्रेसवे नेटवर्कने जोडला जाईल, ज्यामुळे वाहतुकीचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन सुरू झाले आहे, लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम अखेर पूर्ण होणार?
१२ वर्षांपासून रखडलेले मुंबई-गोवा महामार्गाचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. 466 किमी महामार्गाचे रुंदीकरण पुढील ५ महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. हे काम पूर्ण झाल्यावर मुंबई ते गोवा फक्त ६ तासांत पोहोचता येईल. या महामार्गावर ४१ बोगदे आणि २१ पूल तयार करण्यात येणार आहेत.
‘शक्तीपीठ महामार्ग’ (Grid Of Expressways in Maharashtra)
तब्बल ८०२ किमी लांबीचा महामार्ग, ८६,००० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणार आहे. यासाठी २७,००० एकर जमीन संपादित केली जाणार
हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमधून जाणार आहे.
यामुळे नागपूर ते गोवा सध्याचे १८ तासांचे अंतर केवळ ८ तासांत पार होणार आहे. महत्त्वाची धार्मिक स्थळे जसे की पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, कोल्हापूरची अंबाबाई आणि कुणकेश्वर मंदिर या महामार्गाने जोडली जातील.
समृद्धी महामार्ग – मुंबई ते नागपूर प्रवास ८ तासांत
७०१ किमी लांबीचा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर ते इगतपुरी (६२५ किमी) आधीच सुरू झाला आहे.
इगतपुरी ते मुंबई (७६ किमी) शेवटचा टप्पा पूर्ण, लवकरच उद्घाटन होणार आहे. पूर्ण महामार्ग सुरू झाल्यावर मुंबई-नागपूर प्रवास १६ तासांवरून ८ तासांवर
कोकण द्रुतगती महामार्गाचे काम अद्याप प्रलंबित (Grid Of Expressways in Maharashtra)
तर एमएसआरडीसीने सुधारित डीपीआर तयार केला, अंतिम मंजुरीसाठी सरकारकडे पाठवला आहे. मंजुरी मिळाल्यावर भूसंपादन आणि प्रत्यक्ष काम सुरू होईल.या प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील महामार्ग युगात ऐतिहासिक बदल घडणार आहे. अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासासाठी हे महामार्ग (Grid Of Expressways in Maharashtra)महत्त्वाची भूमिका बजावतील